Maharashtra Assembly Election 2024 Aurangabad East constituency : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र राज्यातील जनतेला पाहायला मिळालं आहे. येथील महाविकास आघाडीमधील बंड पूर्णपणे शमलं आहे. मात्र याचा मविआपेक्षा महायुतीलाच अधिक आनंद झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. येथील शिवसेना (ठाकरे) पक्षातील बंडखोर उमेदवार राजू वैद्य यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर काँग्रेसचे या मतदारसंघातील उमेदवार लहू शेवाळे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) आभार मानायला हवे होते. मात्र, त्याऐवजी राज्य सरकारमधील मंत्री, भाजपा नेते तथा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) आभार मानले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे (ठाकरे) वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे आभार मानले. तसेच अतुल सावे खैरे यांच्या पाया देखील पडले.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात हिंदूइंतकीच मुस्लिम मतदारांची संख्या आहे. या मतदरासंघात अतुल सावे यांच्यासमोर एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचं देखील तगडं आव्हान आहे. या मतदारसंघात काँग्रेसने लहू शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिवसेनेने (ठाकरे) किंवा त्यांच्या बंडखोराने येथून निवडणूक लढवली असती तर हिंदू मतांचं विभाजन होण्याचा अधिक धोका होता. याचा अतुल सावे यांना मोठा फटका बसला असता. तसेच एआयएमआयमला फायदा झाला असता. त्यामुळे वैद्य यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अतुल सावे यांच्या समोरील मोठा मोठी चिंता मिटली आहे. त्यामुळेच राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अतुल सावे यांनी वैद्य यांच्यासह चंद्रकांत खैरे यांचे आभार मानले आहेत. तसेच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
rohit pawar reaction on raj thackeray criticism
“राज ठाकरेंना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी महाविकास आघाडीच्या…”; नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : उद्धव ठाकरेंना धक्का, ज्याच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली त्याचाच शिंदे गटात प्रवेश

काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला

नांदेड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छूक असल्याची वावडी उठवून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद (पूर्व )मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे २०१९ मध्ये विजयी झाले होते. या वेळी या मतदारसंघात कॉग्रेसनेही निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काही दिवसांनी काँग्रेसने येथील उमेदवार बदलला. काँग्रेसने येथून लहुजी शेवाळे यांनी उमेदवारी दिल आहे. त्यामुळे औरंगाबाद (पूर्व ) मतदारसंघाची लढत तिरंगी होईल. या मतदारसंघात नव्या मतदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एमआयएमकडून लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून चालू होती. जलील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात जोरदार तयारी केली आहे.

Story img Loader