औरंगाबादमध्ये गच्चीवरून पडून १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पोलीस अधिक तपास करत आहेत

औरंगाबादमधील मयुरपार्क येथे १४ वर्षाच्या मुलाचा घरातील गच्चीवरुन पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शैलेश कैलास सोनवणे असे या मुलाचे नाव असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मयूर पार्कमधील मारुतीनगरमध्ये कैलास सोनावणे आणि त्यांचे कुटुंबिय राहतात. कैलास हे सैन्यातील निवृत्त जवान आहेत. कैलास यांचा मुलगा शैलेशवर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी सोनावणे दाम्पत्य कामात व्यस्त होते. याच दरम्यान शुभम दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. काही वेळाने आई- वडिलांना काही तरी खाली कोसळल्याचा आवाज आला. त्यांनी गच्चीवर धाव घेतली असता शुभम गच्चीवरुन खाली पडल्याचे निदर्शनास आले.  गंभीर जखमी झालेल्या शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aurangabad 14 year old dies after falling out of terrace in mayur park

ताज्या बातम्या