scorecardresearch

Premium

VIDEO: “तू आधी खोटं बोलला…”, भाजपा आमदार आणि माजी उपसरपंचामध्ये भर कार्यक्रमात राडा

भाजपा आमदार आणि माजी उपसरपंचामध्ये भर कार्यक्रमात जोरदार बाचाबाची झाली आहे. घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

bjp mla prashant bamb
भाजपा आमदार प्रशांत बंब आणि उपसरपंचात बाचाबाची

गंगापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब आणि एका माजी उपसरपंचामध्ये भर सभेत बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारावर आमदार आणि माजी उपसरपंच आपसात भिडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी उपसरपंच आणि आमदारांचा हा वाद जिल्ह्यात चर्चेत विषय बनला आहे.

भाजपा आमदार प्रशांत बंब ‘जनता दरबार’ कार्यक्रमानिमित्त नागरिकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी सभास्थळी उपस्थित असलेल्या माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक प्रतिप्रश्न केले. आमदारांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, असा आरोप करत माजी उपसरपंच आक्रमक झाले. तुम्ही केवळ सकारात्मक बोलता, पण नकारात्मक कामं करता. कधी सकारात्मक कामंही करा, असंही माजी उपसरपंच बोलत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

Narendra Modi at rajghat
Gandhi Jayanti 2023 : मोदी, खरगेंसह दिग्गज नेत्यांनी केलं राजघाटावर अभिवादन, गांधी विचारांना दिला उजाळा
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
hasan mushrif
पालकमंत्री शिंदे गटाचे असताना शेतकरी संघाचे कुलूप तोडण्याचे धाडस केलेच कसे? हसन मुश्रीफ यांची विचारणा
sanjay raut on rahul narvekar
“घानाच्या शिष्टमंडळात राहुल नार्वेकरांचं नाव नव्हतं, मात्र…”; आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

हेही वाचा- “टरबुजालाही पाणी लागतं”; उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले, “सर्वस्व गेलेल्या…”

दुसरीकडे, आमदार प्रशांत बंब संबंधित उपसरपंचाला उद्देशून युक्तीवाद करत आहेत. “तू आधी खोटं बोलला की नाही, तू आधी माझं ऐकून घे… प्लिज तू असं करू नकोस… तुला जे बोलायचं ते नंतर बैठक घेऊन बोल. मी यांचं ऐकून घेतलं आहे. मी १५ तारखेच्या आत नागरिकांशी बोलतो…”, असे उद्गार प्रशांत बंब काढताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla prashant bamb and former deputy sarpanch hassle in janata darbar event viral video rno news rmm

First published on: 28-08-2023 at 13:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×