औरंगाबाद-जालना येथे काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला िहगोलीत प्रशस्तिपत्र कशाच्या आधारे दिले, असा सवाल करून ६० कोटींची कामे वेळेत न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अशोक बिल्डरची कामे काढून घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मराठवाडा व विदर्भात वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी १ हजार ३०० कोटींचा प्रस्ताव येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र, कामे दर्जेदार कशी होतील, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बावनकुळे यांनी महावितरणच्या कामांचा आढावा घेतला. आमदार डॉ. संतोष टारफे व तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुंबईचे प्रकल्प संचालक पी. यू. िशदे, मुख्य अभियंता आर. जी. शेख, अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे, कार्यकारी अभियंता शांतिलाल चौधरी आदींची उपस्थिती होती. ऊर्जामंत्र्यांनी होऊ घातलेल्या इन्फ्राच्या कामातील विलंब, तसेच वीज ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सरासरी बिलावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
इन्फ्राची कामे करताना एकेका अभियंत्यावर ६० कोटींच्या कामाचा भार कशासाठी, असा सवाल करून या साठी परत अभियंत्याची िवग पाठावा, असेही बावनकुळे यांनी मुख्य अभियंत्यांना सुनावले. औरंगाबाद-जालन्यामध्ये काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला येथे प्रशासकीय पत्र कशाच्या आधारवर दिले, त्याच्या कामाची तपासणी केली काय? या प्रश्नावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. साठ कोटींची कामे घेऊन कामे न करणाऱ्या अशोक बिल्डरची कामे काढून घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
बठकीनंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बावनकुळे यांच्या हस्ते िहगोलीतील महावितरण कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन, तसेच कार्यालय परिसरातील मदानात रोपे लागवड करण्यात आली. तत्पूर्वी अमरावतीवरून परभणीकडे जाताना जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे उपकेंद्राचे उद्घाटन झाले.
पत्रकारांचा बहिष्कार
ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या िहगोली दौऱ्याच्या कार्यक्रमात दोनदा बदल होऊनही प्रत्यक्षात त्यांचे आगमन उशिराने झाले. पहिल्या दौऱ्यातील कार्यक्रमात संध्याकाळी साडेपाच, तर सुधारित दौऱ्यात साडेसात वाजता पत्रकारांची बठक घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, मंत्री बावनकुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर रात्री पावणेआठच्या सुमारास दाखल झाले. या वेळी बठक सभागृहातून काही पत्रकारांना बाहेर काढण्यात आले, तसेच बठकीचा शिष्टाचार न पाळता इतरांना मात्र बठकीत बसण्याची मुभा दिली होती. रात्री साडेनऊ वाजता मंत्र्यांनी पत्रकारांना बठकीस बोलावले. मात्र, सभागृहातून पत्रकारांना हाकलून दिले जाते. प्रोटोकॉल न पाळता इतरांना बसण्याची संधी मिळते, याकडे लक्ष वेधून पत्रकारांनी सभागृहातून काढता पाय घेतला.