गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी महिना २५ हजारांची मागणी करून त्यातील १० हजार दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासाठी व २ हजार स्वतःसाठी घेणारा पोलीस नाईक रणजित सहदेव शिरसाठ यास गुरुवारी सायंकाळी रकमेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तक्रारदाराने २४ मार्च रोजी गुटख्याची तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी नंदकिशोर क्षीरसागर यांच्या पथकाने सापळा रचला. पोलीस नाईक रणजित शिरसाठ यास स्वतःसह पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसाठी मिळून १२ हजार रुपये घेताना पकडण्यात आले.
गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांकडूनच आश्नय दिला जात आहे, ही बाब आजच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bribe illegal trafficking gutkha daulatabad police inspector sunita misal and police naik trap bribery amy
First published on: 19-05-2022 at 23:22 IST