छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ातील ७५ नगरपालिका आणि नगरपंचायतीपैकी ३४ नगरपालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सरासरी चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. पावसाने दडी मारल्याने पिकांची दुरवस्था झाली आहे. ५० टक्के खरीप हंगाम हातचा गेला आहे. सरासरी दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अशा प्रदेशातील विकासासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने मंत्रिमंडळाचे ढोलताशे जोरदारपणे वाजविले जात आहेत.

 अनेक नगरपालिकांमध्ये पाणी पुरवठय़ाची मोठी अडचण होणार असल्याचे अहवाल मंत्रीमंडळसमोरही ठेवण्यात आले आहेत. नांदेड, हिंगोली वगळता मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासू शकते, असा अंदाज आहे. मराठवाडय़ात सध्या ८६  टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शु्क्रवारी काही भागात पाऊस झाला तरी धरणसाठय़ात वाढ होईल एवढा तो अधिक नाही. मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर सजविण्याची एका बाजूला घाई सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पंधरा मोर्चे निघतील.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

या नगरपालिकांमध्ये चार ते सात दिवसांआड पाणीपुरवठा

  • कन्नड, गंगापूर, खुलताबाद, जालना, माजलगाव, धारूर, आष्टी, पाटोदा, अहमदपूर, जळकोट (चार दिवसांआड पाणीपुरवठा)
  • अंबड, गंगाखेड, वसमत, औसा, शिरूरअनंतपाळ, रेणापूर, उस्मानाबाद, नळदुर्ग (पाच दिवसांआड पाणीपुरवठा)
  • शिरूरकासार (सहा दिवसांआड पाणीपुरवठा)
  • भोकरदन, बदनापूर (सात दिवसांआड पाणीपुरवठा)
  • बीड, जाफराबाद, उमरगा, लोहारा (आठ दिवसांआड पाणीपुरवठा)

बैठकीवर कोटय़वधींची उधळपट्टी- पटोले

मुंबई :  मराठवाडय़ात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये  मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवणे म्हणजे मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  केली. यापूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘सुभेदारी’ या  विश्रामगृहात मुक्काम केला होता असे पटोले म्हणाले.

Story img Loader