छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती भागात एका कारने सकाळी ९.१५ च्या सुमारास सहा जणांना उडविले. या अपघातामध्ये ७० वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गुणाजी लक्ष्मण शेवाळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अन्य दोनजण गंभीर जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरधाव वेगाने जाणाऱ्या या कारने अनेकांना उडविल्याने खळबळ उडाली. काळा गणपती भागात येणाऱ्या भाविकावर गाडी घालणारा या व्यक्ती कोण याचा तपास पोलीस घेत आहेत. या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली. कार क्र एम.एच २० एचएच ०७४६ सिडको बसस्थानाकडून काळा गणपतीकडे जात असताना सहा जणांने चालकाने उडवले. दोन गंभीर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर कारचालक पळून गेला. सिडको भागातील ही कार असावी असे सांगण्यात येत आहे.