छत्रपती संभाजीनगर: दोन वेगवेगळ्या धर्मांमधील तरुण-तरुणीला गजबजलेल्या भागात एकत्र बोलताना पाहून आलेल्या जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सुभेदारी विश्रामगृहाजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. काही वेळ या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु सिटी चाैक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भागात दाखल झाल्या.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: तामिळनाडूतील टेक्सटाईल कंपनीकडून एक कोटींची फसवणूक

दरम्यान, तरुण-तरुणी तेथून निघून गेले होते. याप्रकरणी मारहाण झालेला तरुण, त्याच्या सोबतची तरुणी व जमावात कोण-कोण होते, याची कुठलीही माहिती सायंकाळपर्यंत हाती लागली नसून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. शोध लागल्यानंतरच प्रकरण काय ते समजून घेऊन त्यानुषंगाने तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.

Story img Loader