Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2017 Winner List: छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१७ साली जिल्हा परिषदेच्या ६२ जागांसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २२ जागांवर विजय मिळत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेने (एकत्र असताना) १८ जागेवर विजय मिळवला होता. भाजपाने यावेळी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली होती.
काँग्रेसला १६ जागांवर यश, मनसेच्या पदरात एक जागा
२०१७ साली केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. भाजपाच्या लाटेचा स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही मोठा फायदा झाल्याचे निकालतून समोर आले होते. संभाजीनगरमध्ये काँग्रेसला १६ जागांवर समाधान मानावे लागले, तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ एकच जागा जिंकता आली.
पक्षीय बलाबल
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
| भाजप | २२ |
| शिवसेना | १८ |
| काँग्रेस | १६ |
| राष्ट्रवादी | ३ |
| मनसे | १ |
| अपक्ष (भाजप पुरस्कृत) | १ |
| अपक्ष | १ |
| एकूण | ६२ |
भाजपा – शिवसेना युतीचे सरकार
२२ जागांसह सर्वात मोठ्या ठरलेल्या भाजपाने त्यावेळी एकत्र असणाऱ्या शिवसेनेसोबत सत्ता मिळवली होती. यावेळी शिवसेना भाजपासोबत राज्यात आणि केंद्रातही सत्तेत होती. देशात सर्वत्र चर्चा असलेल्या मोदी लाटेचा त्यावेळी भाजपासह मित्रपक्ष शिवसेनेला देखील मोठा फायदा झाला होता.
राष्ट्रवादी, मनसेला धक्का
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी (एकत्र असताना) पक्षाला केवळ तीन जांगावर यश मिळवता आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ एक जागा जिंकता आली. २०१७ मध्ये जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी आणि मनसेच्या पारड्यात कमी जागा टाकल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेवर देवयानी पाटील यांची वर्णी लागली होती.

