Chhatrapati Sambhajinagar ZP Election Results LIVE Updates (छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Chhatrapati Sambhajinagar ZP Election Schedule 2026)

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.

त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक टप्पातारीख / वेळ
सूचना प्रसिद्धी१६ जानेवारी
नामनिर्देशन स्वीकारणे१६ जानेवारी ते २१ जानेवारी
छाननी२२ जानेवारी २०२६
माघारीची अंतिम मुदत२७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप२७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर
मतदान७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत
मतमोजणी९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Chhatrapati Sambhajinagar Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ६३ निवडणूक विभाग आणि ९ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १२६ पंचायत समिती वॉर्ड आहेत.

माहितीसंख्या
जिल्हा परिषद एकूण वॉर्ड६३
पंचायत समिती (सीट संख्या)
पंचायत समिती एकूण वॉर्ड१२६

Chhatrapati Sambhajinagar Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजप पक्ष २२ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १८ जागांसह शिवसेना पक्षाची कामगिरी राहिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना (SHS) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर देवयानी पाटिल यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)चे केशवराव तायडे यांनी बाजी मारली होती.

पक्षाचे नावजिंकलेल्या जागा
भाजप२२
शिवसेना१८
काँग्रेस१६
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष (भाजप पुरस्कृत)
अपक्ष
एकूण६२

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Ward Wise Results 2017)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ६३ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.

वॉर्ड क्रमांकविजेत्याचे नावविजेत्या पक्षाचे नाव
गोपीचंद गबारू जाधवभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
पुष्पाबाई प्रकाश काळेभारतीय जनता पक्ष (BJP)
मोनाली राजेंद्र राठोडशिवसेना (SHS)
सरला गणेश बनकरभारतीय जनता पक्ष (BJP)
गजानन दत्तात्रय राऊतभारतीय जनता पक्ष (BJP)
सिमा रवींद्र गव्हाणेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
शिल्पाबाई अशोक गरुडभारतीय जनता पक्ष (BJP)
मीना विनोद गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
श्रीराम नागोराव महाजनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
१०केशवराव यादवराव तायडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
११अनिता ज्ञानेश्वर मोठेभारतीय जनता पक्ष (BJP)
१२पुनमबाई उद्यसिंग राजपूतराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
१३शिवाजी भागाजी ठाकरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
१४संदीप तात्याराव पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
१५शुभांगी भाऊसाहेब काजेशिवसेना (SHS)
१६धनराज शिवसिंग बेडवालभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
१७किशोर नारायणराव पवारभारतीय जनता पक्ष (BJP)
१८सुरेश गंगाधर गुजराणेभारतीय जनता पक्ष (BJP)
१९रेणुका रमेश जाधवभारतीय जनता पक्ष (BJP)
२०जितेंद्र चंदनलाल जयस्वालभारतीय जनता पक्ष (BJP)
२१किशोर माणिकराव बलांडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
२२शिवाजी अण्णासाहेब पाथ्रीकरभारतीय जनता पक्ष (BJP)
२३अनुराधा अतुल चव्हाणभारतीय जनता पक्ष (BJP)
२४लहानू गंगाधर गायकवाडभारतीय जनता पक्ष (BJP)
२५सुरेश साहेबराव सोनवणेभारतीय जनता पक्ष (BJP)
२६हिंदवी जगदीश पवारभारतीय जनता पक्ष (BJP)
२७शोभाबाई शिवदास पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
२८पार्वतीबाई रामहरी जाधवशिवसेना (SHS)
२९सपना वसंत पवारभारतीय जनता पक्ष (BJP)
३०नीताबाई दीपकसिंग राजपूतराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
३१वैशाली दादासाहेब पाटीलशिवसेना (SHS)
३२रमेश नानासाहेब बोरनारेशिवसेना (SHS)
३३पंकज सुधाकर ठोंबरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३४अविनाश अशोक गलांडेशिवसेना (SHS)
३५देवयानी कृष्णा पाटीलशिवसेना (SHS)
३६शामराव आनंद बनसोडेभारतीय जनता पक्ष (BJP)
३७उषा दत्तू हिवाळेभारतीय जनता पक्ष (BJP)
३८रामदास गंगाधर पारोडकरभारतीय जनता पक्ष (BJP)
३९मनीष ज्ञानेश्वर सिडलांबेशिवसेना (SHS)
४०शितल प्रशांत बनसोडशिवसेना (SHS)
४१मधुकर काशीनाथ वालतुरेभारतीय जनता पक्ष (BJP)
४२स्वाती दिलीप निर्फळशिवसेना (SHS)
४३छाया जीवन अग्रवालभारतीय जनता पक्ष (BJP)
४४रेणुका सुरेश शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४५बबन गंगाराम कुंडारेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४६मीना रामराव शेळकेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४७संतोष रतन शेजुळभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४८कलीम कोंडन सय्यदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४९रेखा गजानन नांदुरकरभारतीय जनता पक्ष (BJP)
५०ज्योती अनिलकुमार चोरडियाभारतीय जनता पक्ष (BJP)
५१रमेश लक्ष्मण गायकवाडरिपब्लिकन पक्ष खोरिपा
५२रमेश देविदास पवारशिवसेना (SHS)
५३प्रकाश लिंबाजी चांगुलपायेभारतीय जनता पक्ष (BJP)
५४विजय अंबादास चव्हाणमहाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)
५५कविता गोरख चव्हाणशिवसेना (SHS)
५६विलास संदीपनराव भुमरेशिवसेना (SHS)
५७पल्लवी पवन नवथरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
५८साधना कमलाकर येडकेशिवसेना (SHS)
५९कुसुमबाई कारभारी लोहकरेशिवसेना (SHS)
६०अक्षय भिवाजी जयभायेशिवसेना (SHS)
६१मनीषा साईनाथ सोलटशिवसेना (SHS)
६२शिल्पाताई ज्ञानेश्वर कापसेशिवसेना (SHS)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Chhatrapati Sambhajinagar ZP Ward Wise Election Results 2026)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ६३ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये एकूण १२६ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,७०१,२८२ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.

महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे

क्रमांकपंचायत समित्यांची नावे
कन्नड पंचायत समिती
सोयगाव पंचायत समिती
सिल्लोड पंचायत समिती
फुलंब्री पंचायत समिती
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती
खुलताबाद पंचायत समिती
वैजापूर पंचायत समिती
गंगापूर पंचायत समिती
पैठण पंचायत समिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

प्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?

उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.

प्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.

प्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?

उ. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एकूण ६३ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात ९ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण १२६ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.

प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?

उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.

प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?

उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.

प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?

उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.

प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?

उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.

प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?

उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.

प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?

उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.

प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?

उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.

प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?

उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.

प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?

उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.

प्र. मतदारांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?

उ. मतदारांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.

डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.