औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे साडे सात हजार पदांसाठी पोलीस भरती लवकरच करण्यात येईल, तसेच टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास टिव्ही सेंटर भागात त्यांचे आगमन झाले. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करून गोंधळ सुरू केला. नेमका काय प्रकार आहे, याचा कानोसा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्यानंतर त्यांना पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण असल्याचे सांगण्यात आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळील पायऱ्या चढून जात  साडे सात हजार पदांसाठी भरती करण्यात येईल. या संदर्भाने गृह विभागाच्या सचिवांसह अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येईल, असे जाहीर केले.

तरूणांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस भरतीची घोषणा करावी लागली. तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या टीव्ही सेंटरजववील पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी ५ कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde announcement police recruitment funds beautification sambhaji maharaj statue area ysh
First published on: 01-08-2022 at 00:02 IST