scorecardresearch

जन्मदात्रीच्या हत्येत मुलीचा हात; आरोपी कोठडीत

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा प्रियकर, मित्र आणि बारा वर्षीय मैत्रीणीला सोबत घेऊन खून केल्याप्रकरणातील दोन आरोपींना १३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा प्रियकर, मित्र आणि बारा वर्षीय मैत्रीणीला सोबत घेऊन खून केल्याप्रकरणातील दोन आरोपींना १३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दिले आहेत. दीपक राजू बताडे व सुनील उर्फ राहुल संजय मेहर, अशी आरोपींची नावे आहेत. मृत महिलेची मुलगीही १७ वर्षीय म्हणजे अल्पवयीन असून तिचा घटनेत हात आहे, तर दुसरी बारा वर्षांची असल्याने दोघींचीही सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
या प्रकरणात दीपक बताडे व खून झालेल्या महिलेच्या १७ वर्षीय मुलीचे परस्परांवर प्रेम जडले होते. मात्र, दोघांच्याही लग्नाला ३९ वर्षीय मृत महिलेचा विरोध होता. त्यातून ९ मे रोजी बाळापूर शिवारात बटईने करण्यात येणाऱ्या शेतात मृत महिलेस बोलावून घेतले व वरील चौघांनी मिळून गळा चिरून तिचा खून करण्यात आला. दीपक हा मूळ अहमदनगरच्या पाथर्डीचा असून सुनील हा शहरातील गारखेडा परिसरातील रहिवासी आहे. या दोघांकडून खुनाच्या घटनेतील चाकू हस्तगत करायचा आहे. त्यांच्या कटात आणखी कोण सहभागी आहे, गुन्हा करण्यास कोणी प्रोत्साहित केले, याच्या तपासासाठी दीपक व सुनीलला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी न्यायालयाकडे केली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daughter mother murder accused custody police custody magistrate s s manjrekar crime amy

ताज्या बातम्या