उस्मानाबादच्या संगीत रसिकांना स्वरचतन्याने भारून टाकणारा आणि मनोदीप उजळविणारा संगीत दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शहरातील वडगावकर कुटुंबीयांच्या वतीने बालाजी मंदिरात याचे आयोजन करण्यात आले होते. दूरचित्रवाणी कलावंत गानगंधर्व पंडित उमेश चौधरी, सूरमणी भाग्यश्री देशपांडे-पाटील, सतारवादक उस्ताद अझीम खान यांच्या जुगलबंदीने ‘अहिरभरव’ राग सजला. त्यांना तबल्याची साथ प्रसाद सुतार यांनी, तर हार्मोनियमची साथ पांडुरंग देशपांडे यांनी केली. रागाचे बोल होते, ‘तोरे जिया सुख पावें।’ आणि मनव तू जागत रैना. यानंतर पांडुरंगी रंगले, विष्णुमय जग-वैष्णवांचा धर्म। गुंतता हृदय हे.., हे सुरांनो चंद्र व्हा, देवाघरचे ज्ञात कुणाला, सोहं हर डमरू बाजे, मज गणाचा गणपती, अशा सुरेल गाण्यांच्या जुगलबंदीत या कलावंतांनी रसिकांना चिंब केले.
राजास जी महाली । सौख्ये कधी मिळाली? । ती सर्व प्राप्त झाली । या झोपडीत माझ्या ॥ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या गाण्याच्या भरवीने सांगता झाली. वडगावकर घराण्यातील सर्वानी सामुदायिकपणे या भरवीचे गायन केले. त्याचे गायन नेतृत्व प्रसिद्ध गायिका राणी वडगावकर-देशपांडे यांनी केले. याच कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक पांडुरंग मुखडे यांची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
वैभव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, पांडुरंग मुखडे, दीपक िलगे, जयकुमार नायगावकर, आनंद समुद्रे, विजयश्री अत्रे, प्रभाकर चोराखळीकर, युवराज नळे, अॅड. देवीदास वडगावकर, अॅड. मेंढेकर व अॅड. प्रवीण अत्रे यांची उपस्थिती होती.