महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार पोकळ घोषणाबाजी करत आहे तर विरोधी पक्षातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी विरोधाचे नाटक करण्यात गूंग असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बठकीत केला.
अहमदपूर येथील किसान सभेच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी ते लातुरात आले होते. आंबेडकर म्हणाले जून, जुल महिन्यात राष्ट्रवादीने दुष्काळाच्या प्रश्नावर जेलभरो आंदोलन करून रान उठवले. मुख्यमंत्री तेव्हा जपानच्या दौऱ्यावर होते तेव्हा हा पसा दुष्काळाच्या प्रश्नावर खर्च झाला पाहिजे अशी भाषा वापरण्यात आली. आता जेव्हा शेतकरी संकटात आहे तेव्हा मात्र शरद पवारांच्या अमृत महोत्सवी सत्कारात सर्वजण गूंग आहेत, सत्कारावर होणारा खर्च शेतकऱ्यांसाठी का खर्च केला जात नाही असा सवाल शेतकरी विचारत असल्याचे ते म्हणाले.
सातव्या वेतन आयोगात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर आघात करण्यात आला आहे, त्यावर टीका करत या प्रश्नावर सहा जानेवारी रोजी दिल्लीत बठक बोलावण्यात आली असून त्यामध्ये रणनीती ठरवली जाईल, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी व नवाज शरीफ यांच्या भेटीवर टीप्पणी करताना आंबेडकर म्हणाले, मोदींनी रिटर्न गिफ्ट म्हणून दाऊदला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी करावी, यासाठी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकत्रे मोच्रे काढणार असतील तर अशा मोर्चात आपणही सहभागी होऊ, असेही ते म्हणाले. दुष्काळाच्या बाबतीत शासनाने गंभीर भूमिका घ्यावी, राज्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी पावसाळ्याच्या काळात हेलिकॉप्टरचा वापर करून बिया टाकाव्यात त्यातील केवळ काही टक्के बियाणे जोपासले तरी वनक्षेत्र वाढेल. अकोल्यात हा प्रयोग करणार असल्याचे ते म्हणाले.