व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाटयशास्त्र महत्त्वाचा विषय असून सरकारने माध्यमिक शाळेपासूनच तो सुरू करावा, असे अभिनेते संजय सुगावकर यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाटयशास्त्र विभागाच्या ४१ व्या एकांकिका महोत्सवाचे उद्घाटन विभागाचे माजी विद्यार्थी व अभिनेते सुगावकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नाटयशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर होते. रंगभूमीवर आपली छाप निर्माण करण्यासाठी कलावंतांनी मेहनत केली पाहिजे. नाटयशास्त्र विभागातून चांगले कलावंत घडावे आणि नाहीच घडले तर निदान चांगले प्रेक्षक घडावेत, अशी अपेक्षा सुगावकर यांनी व्यक्त केली. कलाक्षेत्रात कुणी पहिल्याच प्रयत्नात स्टार होतो, तर कुणी आयुष्यभरही स्टार होत नाही. म्हणून या क्षेत्राकडे फार डोळसपणे पाहण्याची गरज आहे, असेही सुगावकर म्हणाले.
काही विद्यार्थ्यांनी स्वत: लिहिलेल्या एकांकिकेचे सादरीकरण होण्यासाठी, तसेच त्यांना त्यांच्या लिखाणातील व दिग्दर्शनातील उणिवा भरून काढण्याची संधी प्राप्त व्हावी, या साठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या व्यतिरिक्त इच्छूक विद्यार्थ्यांना एकांकिका सादरीकरणाची संधी देणार आहोत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करीत एकांकिका महोत्सव आíथक मदतीशिवाय नाटय़कलेचे पाईक होऊन विद्यार्थी करणार आहेत, हे अभिनंदनीय आहे, असे डॉ. बऱ्हाणपूरकर म्हणाले. उद्घाटनानंतर प्रवीण पाटेकर लिखित व संदीप कणके दिग्दíशत ‘कॉमन लाईफ’ एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. सुनील टाक यांनी सूत्रसंचालन केले.
२१ एकांकिकांचे सादरीकरण
महोत्सवात २१ एकांकिका सादर होणार आहेत. २५ जानेवारीपर्यंत नाटयशास्त्र विभागाच्या खुल्या रंगमंचावर दररोज सायंकाळी ६ वाजता एकांकिका सादर होणार आहेत. यामध्ये कॉमन लाईफ, गिफ्ट, हिरकणी, देता आधार की करु अंधार, आंधळ्या खिडक्या, झाड, श्ॉडो, अंधार वैद, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, साडे सहा रुपयांचे केले काय, भीक म्हणजे, नदी प्यासी थी, तहान, स्टॅच्यु, कावकाव, मोराची जोडी, हार्टस् बीटस्, पैलुवा, उद्याची सकाळ मस्त आहे, दोनच रंग, प्रकाशाच्या दारी या एकांकिकांचा समावेश आहे.