चार कोटी ६१ लाख रुपये दंड वसूल; महावितरणची वर्षभरातील कारवाई

औरंगाबाद : मराठवाडय़ातील गेल्या वर्षभरात  वीज चोरांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत वीज मीटरच्या तपासणीसह छापे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी  नऊ हजार २२०  ग्राहकांवर १२ कोटी ८५ लाख  ५१ हजार रुपयांच्या  वीज देयक दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली. तसेच चार कोटी ६१ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. अशा ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, वायर  टॅप करणे आदी प्रकारातून चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ५६  वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातूर परिमंडलात दोन हजार १७९  ग्राहकांवर वीज चोरी प्रकरणी तीन कोटी १४  लाख २७ हजार रुपये दंडाच्या देयकाची आकारणी करण्यात आली. यामध्ये ६०८ ग्राहकांकडून एक कोटी ५८ लाख ५४ हजार रुपये देयकाची वसुली करण्यात आली. नांदेड परिमंडलात तीन हजार ३५९  ग्राहकांवर वीज चोरी प्रकरणी चार कोटी ८७ लाख ३२ हजार रुपये दंडाच्या अनुमानित बिलाची आकारणी करण्यात आली. यामध्ये ९६९  ग्राहकांकडून एक कोटी ४० लाख ९४  हजार रुपये बिलाची वसुली करण्यात आली. तर १९ वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीज चोरांवरील धडक कारवाईचा तपशील कोटी रुपयांमध्ये

परिमंडल   बिलाची    दंड वसूल आकारणी 

औरंगाबाद  ४८४.१५ १६१.६८

लातूर  ३१४.२७ १५८.५४

नांदेड  ४८४.३२ १४०.९४