छत्रपती संभाजीनगर : मतदारसंघाच्या बांधणीत नवनवे प्रयोग करणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर मतदारसंघात ७५० तरुणांच्या हाताला काम मिळावे या हेतूने ‘हॉलस्टेन’ जातीच्या प्रत्येकी दोन जरशी गायी मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. खुलताबाद तालुक्यात १५० गायींचे वितरण केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदारसंघ बांधणीसाठी वेतन देऊन ‘कार्यकर्ते’ नियुक्त करणाऱ्या बंब यांनी दुष्काळात सामाजिक दायित्व निधीतूनही मतदारसंघात सर्वाधिक शेततळे निर्माण केले होते. राजकीय बांधणी करण्यासाठी विविध प्रकारची माहिती नेत्यांना लागते. अगदी कोणत्या गावात नक्की कोणती समस्या, कोणाला काय अडचण याची माहिती देणारे कार्यकर्ते गावोगावी लागतात. पण समस्या सोडवणुकीसाठी कार्यकर्ते नियुक्त करून त्याचे ‘आऊट सोर्सिंग’ करून आमदार बंब यांनी त्यांच्या मतदारसंघात बांधणी केली आहे. अशा कार्यकर्त्यांच्या यंत्रणेतून आलेल्या माहितीच्या आधारे बेरोजगारीवर मात करण्यासाठी दूध संकलन व विक्री वाढविण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. त्यातूनच दीपावलीच्या वसूबारस या मुहुर्तावर मतदारसंघात १५०० गायी व त्यातून ३५०० हजार लिटर वाढविले जाणार आहे. यासाठी त्यांनी ‘अमूल’ बरोबरही करार केला आहे.

हेही वाचा – बालन्यायनिधीचे वाटप संथगतीने, करोनातील एकल पालक मुलांसाठी मदत

मोठा उद्योग आणल्यानंतर गावातील व्यक्तीला नोकरी करावी लागते. पण गाय किंवा दूधातून एक कुटुंब पायावर उभे टाकते. सहा महिन्यांपूर्वी पंजाब व हरियाणा भागातून आणल्यानंतर गंगापूर मतदारसंघात ४० गायींचा सांभाळ करून एक प्रयोग करून पाहण्यात आला. त्या प्रयोगाच्या आर्थिक गणिताचा ताळमेळ घालण्यात आला. मतदारसंघातील योगेश गोटे नावाच्या कार्यकर्त्यांनी शीतकरण केंद्र सुरू केले आहे. सध्या या शीतकरण केंद्रातून १७ हजार लिटर ‘अमूल डेअरी’ जाते. गुजरातच्या ग्रोधा भागातील दूध पुरवठा आता गंगापूरमधील शेतकरी करत आहेत. या प्रयोगाची व्याप्ती वाढविण्याचे ठरविले असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलातना सांगितले.

पंजाबमधील भटिंडा आणि हरियाणातील गावांमधून ‘हॉलस्टेन’ जातीच्या गायी विकत घेण्यात आल्या. त्या तापमानात त्या मराठवाड्यातील गंगापूर मतदारसंघात वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अमूल डेअरीकडून ३७ रुपये ५० प्रतिलिटरला भाव मिळत असून दुधाचा दर्जा अधिक चांगला असेल तर त्यात प्रतिलिटर ४० पैसे अधिक मिळतात.

हेही वाचा – बारावीच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल, विद्यार्थी पालकांसह बोर्डात

दूध संकलन आणि विक्रीतून राजकीय बांधणी केली जात असे. मात्र, गायीची खरेदी व त्यासाठी लागणारे भांडवल शेतकरी स्वत: उभे करत. आता आमदार बंब यांनी ७५० कुटुंबास १५०० गायी देण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, ‘नुसतेच उद्योग आणूनही उपयोग होणार नाही. हातात पैसा खेळेल असा हा उपक्रम असून एका कुटुंबास किमान २०- २५ हजार रुपयांचे उत्पन्न दोन गायींच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे.’

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experiment of bjp mla for constituency building print politics news ssb
First published on: 11-05-2023 at 10:19 IST