अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास अटक

पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पीडितेने आईसह येऊन सावत्र पित्याविरोधात तक्रार दाखल केली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास अटक
प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद – सोळा वर्षीय युवतीवर वर्षभरापासून अत्याचार करणाऱ्या पित्याला मंगळवारी अटक करण्यात आली असून त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी दिली.

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पीडितेने आईसह येऊन सावत्र पित्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता व तिचे कुटुंबीय हे उत्तर प्रदेशातील लखनौचे मूळ रहिवासी आहेत. आरोपी हा येथे पिठाची गिरणी चालवतो. त्याने पीडितेला धमकावत अत्याचार सुरू ठेवला. दुपारच्या वेळी पीडितेच्या आईला गिरणीवर पाठवून तो अत्याचार करायचा. पीडिता कुटुंबातील चार भावंडांसह सध्या इंदीरानगर परिसरात राहते. सतत होणाऱ्या अत्याचाराने पीडितेने आपबिती आईला सांगितली. आईने अत्याचाराविषयी आरोपीला जाब विचारला असता त्याने मारहाण सुरू केली. दोघींनाही बाहेर जाण्यास मज्जाव केला होता, तक्रारीत म्हटले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“भाजपा नेत्यांवर ईडी, CBI, आयकरची कारवाई झालेली दाखवा, एक लाख रुपये मिळवा”; महाराष्ट्रातील ‘या’ शहरात झळकले पोस्टर्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी