scorecardresearch

औरंगाबाद : जन्मदात्याने जुळ्या मुलांना विष पाजून स्वतःचे जीवन संपविले

भागवत पंजाजी काळे (३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्यांची नावे आहेत. या मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

father poison children jalna
जन्मदात्याने जुळ्या मुलांना विष पाजून स्वतःचे जीवन संपविले (संग्रहित छायाचित्र)

एका कंपनी कामगाराने स्वतः विष प्राशन करून पोटच्या दोन जुळ्यांनाही विष पाजल्याची घटना जालना येथे घडली. त्या तिघांनाही उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले असता संबंधित व्यक्तीचा शनिवारी (दि.28) मृत्यू झाला. भागवत पंजाजी काळे (३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्यांची नावे आहेत. या मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – औरंगाबाद शिक्षकमधील भाजपची मरगळ दूर

हेही वाचा – औरंगाबाद : खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप

भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. सध्या ते जालना येथे वास्तव्याला आहे. शनिवारी सकाळी फिरायला जातो, असे सांगून घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले आणि तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, भागवत काळे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 15:02 IST