दोन वाहनांच्या समोरासमोरील धडकेत पंधरा जण जखमी झाले आहेत. ही घटना टाकळी कुंभकर्ण ते नांदगाव या दरम्यानच्या रस्त्यावर आज शुक्रवारी सकाळी १० वाजता घडली. यातील तेरा जण हे एकाच कुटुंबातील आहेत. जखमींपकी तिघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे.
सेनगाव येथील काळे कुटुंब एम.एच ३८-६९२५ या वाहनाने जिंतूरहून परभणीकडे शुक्रवारी येत होते. याच वेळी वैतागवाडी येथील एम.एच. ३८-२१५१ ही कार परभणीहून बोरीकडे जात होती. सकाळी १० वाजता दोन्ही वाहने नांदगाव आणि टाकळी या दरम्यानच्या रस्त्यावर एकमेकांवर धडकली. दोन्ही गाडय़ांचा वेग असल्याने वाहनांचा चुराडा झाला. या अपघातात सेनगाव येथील लावण्य संतोष काळे (वय ८), विशाल केशरनाथ काळे (वय १३), प्रभावती संतोष काळे (वय ३२), सारिका महावीर काळे (वय २८), सायली महावीर काळे (वय ८), महावीर दिगांबर काळे (वय ३२), रेखा केशरनाथ काळे (वय ३०), केशरनाथ दिगांबर काळे (वय ५५), मोतीराम मारोती कानखेडे (वय ४५), पारस दिगांबर काळे (वय ३५), शेजल पारस काळे (वय ६), विजय गुलाब काळे (वय १२), अबोली काळे (वय १२), तर कारमधील दत्ता डंबाळे (वय १५), अजित विठ्ठल िशदे (वय १५), (दोघे रा. वैतागवाडी) हे जखमी झाले आहेत. कारमधील इतर प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. या सर्व जखमींना परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापकी महावीर काळे, दत्ता डंबाळे आणि अजित िशदे या तिघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.