दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्यामुळे तापमानाचा पारा चढतच चालला असून रविवारी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. केमापूर शिवारात ही घटना घडली.
तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मौजे केमापूर शिवारात उष्माघाताचा एक बळी गेला. सेलू तालुक्यातील वालूर येथून शेगावला जाण्यासाठी पायी िदडी निघाली असून मानवत तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील रहिवासी असलेले प्रकाश अंबादास देशमुख (वय ५५) हे िदडीमध्ये शेगावला जात होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते केमापूर शिवारात एका झाडाखाली थांबले. िदडी पुढे निघून गेली. याच ठिकाणी झाडाखाली प्रकाश देशमुख यांचे निधन झाले. याबाबत केमापूरच्या गावकऱ्यांनी चारठाणा पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे व जमादार देवकर घटनास्थळी पोहोचले.