औरंगाबाद – तब्बल ६७ कोटींच्या  खरेदीची बोगस बिले वापरून त्याद्वारे १२ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २ व्यक्तींना २९ जून रोजी अटक करण्यात आली.

औरंगाबाद वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. फसवणूक व करचोरीच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आक्रमक मोहीम राबवली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून औरंगाबाद येथील ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या दोन व्यवसायिकांकडे अन्वेषणपर छापे टाकण्यात आले.. मे. एस. आर. मेटल आणि मे. ढोअर्स वर्ल्ड या दोन फर्मचे मालक अनुक्रमे समीर चौधरी व मनोज व्यास यांना अटक करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर हजर करण्यात आले. सदर व्यवसायिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नाशिक क्षेत्रातील जीएसटी कायद्यांतर्गत अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात मालाची कोणतीही वाहतूक न करता बनावट ई-वे बिल तयार केल्याची बाब देखील वस्तू व सेवाकर विभागाच्या लक्षात आली आहे. या इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचे अन्वेषण वस्तू व सेवाकर विभागाद्वारे सुरू असून सदर व्यावसायिकांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांची सखोल तपासणी अन्वेषण विभाग करत आहे.

canara bank declared may 15 as the record date for the stock split scheme
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

या कारवाईत वस्तू व सेवाकर विभागाचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे तसेच राज्यकर सहआयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड, सहायक राज्यकर आयुक्त नितेश भंडारे, सहायक राज्यकर आयुक्त प्रकाश गोपनर तसेच अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी सहभाग घेतला.

करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापान्यांच्या विरोधात येणान्या काळात अशा मोहिमा मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती व सर्व व्यापाऱ्यांनी वस्तू व सेवा कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत नियमितपणे करावा असे आवाहन औरंगाबाद विभागाचे राज्यका सहआयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.