scorecardresearch

मुंडके छाटून धड विहिरीत फेकले; आरोपी सहा तासात जेरबंद

आर्थिक देवाण-घेवाणीवरून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचे धड विहिरीत फेकून मुंडके अहमदनगर रस्त्यावर दूर टाकल्याची घटना बुधवारी रात्री गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथे घडली.

आर्थिक देवाण-घेवाणीवरून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचे धड विहिरीत फेकून मुंडके अहमदनगर रस्त्यावर दूर टाकल्याची घटना बुधवारी रात्री गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा छडा लावत सहा तासातच दोघांना अटक केली असून गुन्हा दाखल झालेल्या तिसऱ्याचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली.
शुभम विनोदकुमार नाहटा (वय २३) सचिन सोमनाथ गायकवाड (२२दोन्ही रा. गंगापूर), अशी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आर्थिक देवाण-घेवाणवरून झालेल्या वादातून त्यांचा मित्र विशाल नामदेव गायकवाड (रा. पुणे) यास बोलावून तिघांनी मिळुन लक्ष्मण नाबदे यांचा खून करण्याचा कट रचला आणि चाकुने वार करून प्रेत मांजरी शिवारातील विहीरीत नेऊन टाकले आहे, अशी गोपणीय माहीती पोलिसांना मिळाली. शुभम नाहटा, सचिन सोमनाथ गायकवाड यांना ताब्यात घेतले. विश्वासात घेवुन त्यांना विचारपुस केली असता दोघांनी गुन्हा त्यांचा मित्र विशाल गायकवाड याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. या प्रकरणी रावसाहेब लक्ष्मण नाबदे (वय ३१, रा. बोलेगाव शिवार ता. गंगापूर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Head was cut off body thrown into well accused arrested six hours crime branch police amy

ताज्या बातम्या