औरंगाबाद : ‘मला चष्मा मिळाला, चालण्याला आधार होईल असे वॉकर मिळाले. ‘वयोश्री’ योजनेमुळे मला खूप मदत झाली. अशी योजना आखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद’ असे सांगत सोमवारी वयोवृद्ध शीलाताई पत्की यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्या आजीबरोबर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्याबरोबर  ‘सेल्फी’ काढला आणि तो ‘नमो’ अ‍ॅपवर ‘ पाठवून’ दिला. अशा एक कोटी स्वप्रतिमा अर्थात सेल्फी पाठविण्याच्या देशातील पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी औरंगाबाद येथे करण्यात आले.

एक कोटी संख्येत पाठविलेल्या या प्रतिमा केवळ उपक्रम नाही, तर लोकांच्या आयुष्यात पंतप्रधानांमुळे झालेल्या बदलांचा परिपाक असल्याचे मत या वेळी इराणी यांनी व्यक्त केले. ‘धन्यवाद मोदीजी’ या शब्दांसह लाभार्थीनी पाठविलेल्या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी स्वप्रतिमा (सेल्फी ) कार्यक्रम भाजपच्या वतीने सोमवारी स्मृती इराणी यांच्या हस्ते  झाला.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

या वेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, ‘कोणी लाभार्थी उगाच फोटो काढू देत नसतो. त्याला काही तरी ममत्व वाटत असते. ते आपुलकीचे नाते म्हणून तो फोटो काढू देतो. महिला तर अशा प्रकारे छायाचित्र काढून देणार नाहीत. प्रेमाच्या नात्यातून आम्हाला सन्मान मिळातो आहे, असा संदेश त्यातून द्यायचा असतो म्हणून लाभार्थीसह स्वप्रतिमा काढण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.’ लाभार्भीचे केवळ आकडे नाहीत तर त्यांच्या आयुष्यात बदल झाले आहेत. तो परिणाम सांगण्याचा प्रयत्न असल्याने राज्यातून केवळ एक कोटी नाही तर त्यापेक्षा किती तरी पट अधिक ‘सेल्फी’ भाजपच्या ‘नमो’ अ‍ॅपवर पोहचतील असा दावा या वेळी करण्यात आला. जनधन बँक खाती, कोविडची मोफत लस घेणारे, उज्ज्वला गॅस, स्वच्छता गृह इथपासून ते प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळविणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि त्यांचे छायाचित्र व दहा सेकंदाचे चलचित्रण पक्ष कार्यालयाकडे पाठवा, असा कार्यक्रम आखण्यात आला आहे.