टिप्पर व दुचाकीच्या अपघातात दोन मुलांसह तीन ठार; महिला गंभीर

गिट्टी घेऊन जाणारा टिप्पर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन मुलांसह तीन जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली.

अकोला/जालना/औरंगाबाद : गिट्टी घेऊन जाणारा टिप्पर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन मुलांसह तीन जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बुलढाणा-अजिंठा मार्गावरील मढ फाट्यानजीकच्या महानुभाव आश्रमाजवळ घडली.

या भीषण अपघातात दुचाकीवरील ४० वर्षीय पुरुषाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन मुले आणि ३५ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणाी करून दोन्ही मुलांना मृत घोषित केले. महिला सुद्धा गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. दुचाकीस्वार चार जणांपैकी पती, पत्नी, मुलगा व त्यांचा एक नातेवाईक मुलगा हे मढकडून आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पान वडोद या गावाकडेकडे जात असतांना हा दुर्दैवी अपघात झाला.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Killed children two wheeler accident women serious terrible accident ysh

Next Story
कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत युवकाकडून २ कोटी उकळले; खासगी सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी