Latur Municipal Corporation Election Result Live 2026 : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिका या प्रशासनाच्या भरवश्यावर चालू होत्या. शहरांमधल्या नागरिकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता. पालिकांचं कामकाज पूर्णपणे प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या हातात होतं. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीआधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका अखेर जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाची काय कामगिरी होते? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

लातूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मतदान वेळापत्रक ( Latur Municipal Corporation Election 2026 Schedule ).

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधल्या एकूण २९ महानगरपालिकांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या. यातील लातूर महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ साठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडले असून निवडणुकीच्या निकालासाठी १६ जानेवारी २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली.

टप्पातारीख
उमेदवारी अर्ज सुरू२३ डिसेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख०२ जानेवारी २०२६
मतदान१५ जानेवारी २०२६
निकालाची तारीख१६ जानेवारी २०२६

लातूर महानगरपालिका वॉर्ड व प्रभागांची संख्या ( Latur Muncipal Corporation Wards and Seat Count )

लातूर महानगरपालिकेमध्ये ७० प्रभाग आहेत, महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत आवश्यक असते. २०२६ ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळेही विशेष चर्चेचा विषय ठरली

एकूण वॉर्ड१८
एकूण प्रभाग७०

Latur Municipal Corporation Election Result 2017 – Party-wise Seats लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ मध्ये लातूर महानगरपालिकेच्या १८ वॉर्डमधील ७० जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते.

२०१७ साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाने ३६ जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ३३ जागांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्षाची कामगिरी राहिली.

पक्षाचे नाव जागांची संख्या
भारतीय जनता पक्ष (BJP) ३६
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) ३३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
एकूण जागा७०

लातूर महानगरपालिका प्रभागनिहाय विजेता यादी 2017 – ( Latur Municipal Corporation Ward-wise Winner List 2017 )

Ward Wise Election Results – Latur Municipal Corporation

वॉर्ड क्रमांक 1 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ मीना गोरोबा लोखंडे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब देविदास रामलिंग काळे
भारतीय जनता पक्ष
सीट क समिना खय्युम शेख
भारतीय जनता पक्ष
सीट ड साहिलेश प्रकाश गोजमगुंडे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 2 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ उषाबाई भाऊसाहेब भादीकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब सचिन श्रीरंग बंदापल्ले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क हरुबाई किसान बोविंदवाड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड इम्रान जब्बार सय्यद
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 3 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ वर्षा दत्तात्रय मुखवटा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब सोजर पांडुरंग मदाने
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क विजयकुमार हणमंतराव सब्दे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड मंगेश मोहनराव बिराजदार
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 4 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ कैलास व्यंकटराव कांबळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब निमगौरीबी आसेफ बागवान
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क रफतबी शकील शेख
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड अहमदखान अमीरखान पठाण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 5 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ गौरव जयंत काठवते
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब फरजाना हमीदपाशा बागवान
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क पूजा सुभाष पंचक्षरी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड विक्रांत विक्रम गोजमगुंडे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 6 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ तुळशीराम प्रल्हाद दुडिले
भारतीय जनता पक्ष
सीट ब दीपक आवसकर
भारतीय जनता पक्ष
सीट क भाग्यश्री महेश कौलाखेरे
भारतीय जनता पक्ष
सीट ड सुरेश निवृत्ती पवार
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 7 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ दिप्ती सुनीत खंडागळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब युनूस महमद्युसुफ मोमिन
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क रुबिना सुलेमान तांबोली
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड सचिन अशोक मास्क
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 8 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ वेंकट मारुतीराव वाघमारे
भाजपा
सीट ब जान्हवी मनोज सूर्यवंशी
भाजपा
सीट ग शैलेश बंदू स्वामी
भाजपा
वॉर्ड क्रमांक 9 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ सपना पांडुरंग किसवे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब रेहाना हरुंचौस बसाले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क अशोक वसंतराव गोविंदपुरकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड राजसाब बाशुमिया मणियार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 10 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ कंचन रत्नदीप अजनीकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब दीपक गंगाधर सूळ
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क कालिंदा शरदराव भगत
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड ओमप्रकाश शमराव पाडिले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 11 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ शिवकुमार अंबादास गवळी
भारतीय जनता पक्ष
सीट ब उर्मिला सुभाषराव बरुरे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क रागिनी सतीश यादव
भारतीय जनता पक्ष
सीट ड विशाल हनुमत जाधव
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 12 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ प्रवीण पांडुरंग अंबुलगेकर
भारतीय जनता पक्ष
सीट ब दीपाताई विठ्ठलराव गिते
भारतीय जनता पक्ष
सीट क शेषिकला सुरेश गोमचाले
भारतीय जनता पक्ष
सीट ड देवानंद नारायण साळुंके
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 13 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ युजाना नागसेन कामेगावकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ब अयुब तालेब मणियार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट क कमल त्रिंबक सोमवंशी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट ड बाळासाहेब रावसाहेब देशमुख
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 14 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ नितीश दसराव वाघमारे
भारतीय जनता पक्ष
सीट ब कोमल प्रकाश वायचलकर
भारतीय जनता पक्ष
सीट क स्वाती सुदाम जवळगे
भारतीय जनता पक्ष
सीट ड रविशंकर दत्तोबा ​​जाधव
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 15 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ दीपक उमाकांत अद्वमत्पती
भारतीय जनता पक्ष
सीट ब वर्षा शिरीष कुलकर्णी
भारतीय जनता पक्ष
सीट क श्वेता विक्रम लोंढे
भारतीय जनता पक्ष
सीट ड संजय भद्रप्पा रंडाळे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 16 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ हनुमान नामदेवराव जक्ते
भारतीय जनता पक्ष
सीट ब शकुंतला गोरोबा गडेकर
भारतीय जनता पक्ष
सीट क शीतल शिवप्रसाद मालू
भारतीय जनता पक्ष
सीट ड अजय मधुकरराव कोकाटे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 17 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ सुनील किशन मालवाड
भारतीय जनता पक्ष
सीट ब शोभा महादेव पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट क चंद्रकांत गुरुनाथ बिराजदार
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 18 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अ सरिता गणेश राजगिरे
भारतीय जनता पक्ष
सीट ब भाग्यश्री बालाजी शेळके
भारतीय जनता पक्ष
सीट क अजित शिवाजीराव पाटील
भारतीय जनता पक्ष

लातूर महानगरपालिकेच्या महापौरांची यादी ( Latur Municipal Corporation Mayors List )

महापौरांचे नाव पक्षाचे नाव कालावधी
प्रा. स्मिता खानापुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) २०१२ - २०१४
अख्तर शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) २०१४ - २०१६
दीपक सुल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) १३ मे २०१६ – २१ मे २०१७
सुरेश पवार भारतीय जनता पक्ष (BJP) २१ मे २०१७ – २१ नोव्हेंबर २०१९
विक्रांत गोजमगुंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) २२ नोव्हेंबर २०१९ – २१ मे २०२२

लातूर महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल २०२६ ( Latur Corporation Ward Wise Results 2026 )

इतर महानगरपालिकांचे निवडणूक निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व

नगरसेवक शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांसारख्या नागरिकांसाठीच्या दैनंदिन नागरी सुविधांचं व्यवस्थापन केलं जातं.

FAQs – लातूर महानगरपालिका निवडणूक

१. प्र. लातूर महानगरपालिकेत एकूण किती वॉर्ड आहेत?

उ. लातूर महानगरपालिकेत एकूण १८ वॉर्ड आहेत.

२. प्र. वॉर्डनिहाय निकाल कुठे पाहता येतील??

उ. या पेजवर वॉर्डनिहाय संपूर्ण निकाल उपलब्ध आहे

३. प्र. लातूर महानगरपालिकेत निवडणुका कधी झाल्या?

उ. १५ जानेवारी २०२६

४. प्र. लातूर sमहानगरपालिकेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. १६ जानेवारी २०२६

५. प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

६. प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

७. प्र. नगरसेवकाची कार्ये व जबाबदाऱ्या काय असतात?

उ. पाणी, वीज, रस्ते, सांडपाणी, आरोग्य अशा मूलभूत सरकारी सुविधांचं व्यवस्थापन करणे आणि महानगरपालिकेत महत्त्वाच्या लोकहिताच्या निर्णयांमध्ये सहभाग घेणे.

८. प्र. महानगरपालिका प्रशासनात महापौरांच्या जबाबदाऱ्या व कार्ये काय असतात?

उ. महापौर हे संबंधित महानगरपालिकेचे प्रथम नागरिक असतात. इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर ते संबंधित महानगरपालिका व त्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभांचं अध्यक्षस्थान महापौरांकडे असतं. महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर आधारित समित्या असतात. या समित्यांमध्ये समन्वयाचं काम महापौर करतात. एखाद्या मुद्द्यावर दोन बाजूंना समान मते झाल्यास महापौरांचं मत निर्णायक असतं. मात्र, याव्यतिरिक्ति महापौरांना प्रशासनाशी निगडित अधिकार नसतात. हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे असतात.

९. प्र. एखादा उमेदवार एकाहून अधिक प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का?

उ. होय. मात्र, दोन्ही प्रभागांतून निवडून आल्यास दोनपैकी एका प्रभागातील नगरसेवकपदावरचा दावा संबंधित उमेदवाराला सोडावा लागतो.

डिस्क्लेमर

या पृष्ठावर दिलेली निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिसूचना, माध्यम अहवाल व उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आलेली आहे. माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला असला, तरी आकडे, निकाल किंवा तपशीलात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची खातरजमा करावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.