Latur ZP Election Result Live: लातूर जिल्ह्यात पानगाव गणात मनसेचा उमेदवार आघाडीवर

लातूर जिल्ह्यात पानगाव गणात मनसेचा उमेदवार आघाडीवर आहे.

Latur ZP Election Results LIVE Updates (लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Latur ZP Election Schedule 2026)

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.

त्यानुसार, लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक टप्पातारीख / वेळ
सूचना प्रसिद्धी१६ जानेवारी
नामनिर्देशन स्वीकारणे१६ जानेवारी ते २१ जानेवारी
छाननी२२ जानेवारी २०२६
माघारीची अंतिम मुदत२७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप२७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर
मतदान७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत
मतमोजणी९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Latur Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)

लातूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ५९ निवडणूक विभाग आणि १० पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण ११८ पंचायत समिती वॉर्ड आहेत.

माहितीसंख्या
जिल्हा परिषद एकूण वॉर्ड५९
पंचायत समिती (सीट संख्या)१०
पंचायत समिती एकूण वॉर्ड११८

Latur Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजप पक्ष ३६ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १५ जागांसह काँग्रेस पक्षाची कामगिरी राहिली.

लातूर जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर मिलिंद लातुरे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी भारतीय जनता पक्ष (BJP)चे रामचंद्र पंढरीनाथ तिरुके यांनी बाजी मारली होती.

पक्षाचे नावजिंकलेल्या जागा
भाजप३६
काँग्रेस१५
राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेना
इतर
एकूण५८

लातूर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Latur Zilla Parishad Ward Wise Results 2017)

लातूर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ५९ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.

वॉर्ड क्रमांकविजेत्याचे नावविजेत्या पक्षाचे नाव
माधव रंगनाथ जाधवराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
प्रकाश राजेसाहेब देशमुखभारतीय जनता पक्ष (BJP)
मंचकराव मोहनराव पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
मुद्रिका शिवाजीराव भिकाणेभारतीय जनता पक्ष (BJP)
अशोक निवृत्तीराव केंद्रेभारतीय जनता पक्ष (BJP)
मधुबाला हरिदास कांबळवाडभारतीय जनता पक्ष (BJP)
रुक्मिणीबाई बाबुराव जाधवभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
संतोष नामदेवराव तिडकेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
अनिता शिवाजी पारगेभारतीय जनता पक्ष (BJP)
१०शितल कल्याणराव पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
११विजया बसवराज बिरादारभारतीय जनता पक्ष (BJP)
१२बसवराज बाबाराव बिराजदारभारतीय जनता पक्ष (BJP)
१३ज्योती बापूराव राठोडभारतीय जनता पक्ष (BJP)
१४राहुल गोविंदराव केंद्रेभारतीय जनता पक्ष (BJP)
१५उषा शंकर रोडगेभारतीय जनता पक्ष (BJP)
१६आशा ज्ञानेश्वर पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
१७पृथ्वीराज देवराव शिवशिवेभारतीय जनता पक्ष (BJP)
१८रामचंद्र पंढरीनाथ तिरुकेभारतीय जनता पक्ष (BJP)
१९प्रशांत त्र्यंबक पाटीलभारतीय जनता पक्ष (BJP)
२०राजीव त्र्यंबकराव कांबळेभारतीय जनता पक्ष (BJP)
२१गोविंद त्र्यंबकराव चिलकुरेभारतीय जनता पक्ष (BJP)
२२रोहिदास अंबादास वाघमारेभारतीय जनता पक्ष (BJP)
२३अरुणा नारायण कांबळेभारतीय जनता पक्ष (BJP)
२४विमल प्रशांत पाटीलभारतीय जनता पक्ष (BJP)
२५सुधाकर तुकाराम शृंगारेभारतीय जनता पक्ष (BJP)
२६धनश्री राजेश अर्जुनभारतीय जनता पक्ष (BJP)
२७सुरेश ज्ञानेश्वर लहानेभारतीय जनता पक्ष (BJP)
२८सुरेंद्र शिवाजी गोडभरलेभारतीय जनता पक्ष (BJP)
२९संगीता बाबासाहेब घुलेभारतीय जनता पक्ष (BJP)
३०उद्धव माधवराव चेपटभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३१शोभा पंडित ढमालेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३२अरुणा विशाल शिंगडेभारतीय जनता पक्ष (BJP)
३३साधना सुभाष जाधवभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३४सोनाली रमेश थोरमोटेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३५परमेश्वर मारुती वाघमारेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३६शीना भास्कर ढगेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
३७मनीषा श्यामसुंदर वाघमारेभारतीय जनता पक्ष (BJP)
३८दिलीप नामदेवराव नाडेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
३९प्रीती सूरज शिंदेभारतीय जनता पक्ष (BJP)
४०धीरज विलासराव देशमुखभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४१कल्पना भागवत कांबळेभारतीय जनता पक्ष (BJP)
४२दैवशाला प्रभाकर कोल्पकभारतीय जनता पक्ष (BJP)
४३संगीता एकनाथ शिंदे</td>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४४महेश वसंतराव पाटीलभारतीय जनता पक्ष (BJP)
४५संगीता राजेंद्र मानेशिवसेना (SHS)
४६धनंजय चंद्रसेन देशमुखभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४७नारायण लक्ष्मण लोखंडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४८शालिनी रामदास चव्हाणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
४९सुभाष पांडुरंग पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
५०कोमलबाई नीलकंठ धुमाळभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
५१भरतबाई दगडू सोळंकेभारतीय जनता पक्ष (BJP)
५२संजय सीताराम दोरवेभारतीय जनता पक्ष (BJP)
५३कुसुम मुकुंद हालसेभारतीय जनता पक्ष (BJP)
५४धोंडीराम नामदेव बिराजदारभारतीय जनता पक्ष (BJP)
५५संतोष संभाजी वाघमारेभारतीय जनता पक्ष (BJP)
५६अरुणा ज्ञानेश्वर बर्माडेभारतीय जनता पक्ष (BJP)
५७मिलिंद मडोलप्पा लातुरेभारतीय जनता पक्ष (BJP)
५८बजरंग भुजंगराव जाधवभारतीय जनता पक्ष (BJP)

लातूर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Latur ZP Ward Wise Election Results 2026)

लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ५९ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांमध्ये एकूण ११८ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २,४५४,१९६ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.

महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)

लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे

क्रमांकपंचायत समित्यांची नावे
लातूर पंचायत समिती
रेणापूर पंचायत समिती
अहमदपूर पंचायत समिती
जळकोट पंचायत समिती
चाकूर पंचायत समिती
शिरूर अनंतपाळ पंचायत समिती
औसा पंचायत समिती
निलंगा पंचायत समिती
देवणी पंचायत समिती
१०उदगीर पंचायत समिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

प्र. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?

उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.

प्र. लातूर जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.

प्र. लातूर जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?

उ. लातूर जिल्हा परिषदेत एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात १० पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ११८ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.

प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?

उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.

प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?

उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.

प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?

उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.

प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?

उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.

प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?

उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.

प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?

उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.

प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?

उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.

प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?

उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.

प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?

उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.

प्र. मतदारांना लातूर जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?

उ. मतदारांना लातूर जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.

डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.