छत्रपती संभाजीनगर: पंतप्रधानांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. नरेंद्र मोदी यांची भाषणे ऐकल्यानंतर त्यांच्या विचारसरणीतून ते देशाचे नाही, तर फक्त भाजपचेच पंतप्रधान वाटतात. नेहरूंवरील टीकेमुळे मोदी यांची मानसिकता काय, हे समजून येते अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. औरंगाबाद मतदारसंघातील चंद्रकांत खैरे आणि जालना कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

हेही वाचा >>> मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

narendra modi
“ही कुठली खान मार्केट गँग?” ED, CBI च्या कारवाईवरून होणाऱ्या टीकेला पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर
Rahul Gandhi allegation that the Prime Minister announced the overthrow of the Himachal government
हिमाचल सरकार पाडण्याचे पंतप्रधानांकडूनच जाहीर; राहुल गांधी यांचा आरोप
Amit Shah claims that there is no campaign on the basis of religion
धर्माच्या आधारावर प्रचार नाही; अमित शहा यांचा दावा; अनुच्छेद ३७०, मुस्लीम आरक्षण यांवर बोलणारच
narendra modi
ईडीने जप्त केलेला पैसा देशातील गरिबांना मिळणार? पंतप्रधान मोदींचं मोठं विधान; म्हणाले, “केंद्र सरकारद्वारे…”
Lok Sabha election of 1989 Rajiv Gandhi V P Singh Chandra Shekhar
राजीव गांधींचे अर्थमंत्री व्ही. पी. सिंह त्यांना शह देऊन पंतप्रधान कसे झाले?
What Narendra modi said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे?”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
Modis manifesto has no constitutional guarantee says former minister Dr Nitin Raut
मोदींच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेची गॅरेंटी नाही, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची टीका
pm narendra modi solapur loksabha marathi news
“इंडिया आघाडीच्या हाती सत्ता गेल्यास पुन्हा भ्रष्टाचार, दहशतवाद अन् फाळणीचा धोका”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

पवार म्हणाले, की शेतकरी, बेरोजगार यांच्या कल्याणासाठी सत्ता वापरण्याऐवजी हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी टीका केली म्हणून ते कारागृहात आहेत. आरोग्य व शिक्षणासारख्या क्षेत्रात दिल्लीमध्ये जे उत्तम काम करत होते, त्या अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारने कारागृहात डांबले. हा सत्तेचा गैरवापर आहे. स् महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे. शेतकरी फळबागा उखडून टाकत आहे. पाणी नाही; पण त्याची राज्य आणि केंद्र सरकारला यित्कचितही जाणीव नाही, अशी टीका पवार यांनी केली.

‘विधानसभा लक्ष्य, लोकसभेला कमी जागा’

नगर:राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये जाणीवपूर्वक कमी म्हणजे १० जागा स्वीकारल्या, कारण आमचे लक्ष्य विधानसभा आहे. विधिमंडळात आमच्या विचाराची अधिक माणसे हवी आहेत, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज, शनिवारी नगरमध्ये बोलताना मांडली. 

अजित पवार यांना सुनावले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेलगीप्रकरण, दाऊद व भूखंडाचे श्रीखंड याचा संदर्भ देत आरोपांचा पुनरुच्चार केला. या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, इतक्या वर्षांनंतर याची आठवण कशी झाली? इतकी वर्षे तर ते माझ्याच नावाने निवडणूक लढवत होते.