छत्रपती संभाजीनगर : कोणाच्या सांगण्यावरुन मी आंदोलन करत नाही. उदय सामंत यांनी मला भेटण्यापूर्वी परवाानगी घेतली होती का, असा प्रश्न विचारला जातो आहे. पण त्यांना त्यांची काही मर्जी आहे की नाही. प्रसाद लाड हे मराठा म्हणून भेटायला आले. पण ते न विचारता आले असतील असे वाटत नाही. मुख्यमंत्र्या विषयी मनात काही नाही. पण जर त्यांनी आरक्षण प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नीट करुन, वैधता प्रमाणपत्र दिली तर आम्हीच त्यांचा उदोउदो करू, असे सांगत ३० मे पासून उन्हात आंतरवली सराटीमध्ये उपोषण केले जाईल, असे मनाेज जरांगे यांनी जाहीर केले.

मराठा आरक्षण मागणीसह मराठा आणि कुणबी मंत्रालय करण्यास किती वेळ लागतो. पण ओबीसीसाठी मंत्रालय आहे. उन्हामुळे लोक बाहेर निघत नाहीत. पण मे महिन्यात मी आंतरवली सराटी येथे आंदोलन करेन, असे सांगत जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

कोणाच्याही सांगण्यावरुन आंदोलने केले नाहीत. मराठा समाजासाठी मी प्रामाणिक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ना पाणी आहे ना आरक्षण. ज्यांनी प्रश्न सोडवायचे ते लक्ष देत नाहीत. ‘अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या मंत्र्यांवर टीका केली जाते. सर्वसामांन्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ही लोक पुढे येतात. लोकांना भेटतात. पण डिझेल पंपावरील असंतोष बघायला कोणी तयार नाही. सातारा गॅझेटरसारख प्रश्न सोडविण्यासाठी आठ महिने होऊनही कारवाई झाली नाही. भाजप पक्षांतर्गतही मोठी खदखद आहे. असे सांगत जरांगे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर आगपाखड केली.

जरांगे यांनी प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील. मराठ्याविषयी मुख्यमंत्र्याच्या मनात रागात आहे. लाड यांना हे कळाले तरी पुरेसे आहे, असेही जरांगे म्हणाले. नारायण राणे भाजपमध्ये आले. त्यांचे आता काही उरले नाही. काम करुन घेण्यापुरते अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना वापरले जाते, असा आरोपही त्यांनी केला.

उदय सामंत यांना प्रश्न विचारले जातात की जरांगे यांना भेटायला जाताना विचारुन गेले होते का, मग लाड हेही न विचारता आले होते, असे वाटत नाही, असेही जरांगे म्हणाले. सरकारला हवा तेवढा वेळ दिला आहे. २९ मे रोजी १० महिने वेळ दिला आहे. जाणूनबजून अन्याय केला जात असल्याने कठोर निर्णय घेत घेतल्याचे जरांगे म्हणाले.