जालना : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू. दशरथ रायकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मृत व्यक्ती बीड जिल्ह्यातील संगम या गावाचे येथील रहिवासी असल्याची माहिती समजते आहे.

दशरथ रायकर हे जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. रात्री उशिरा ते आंतरवाली येथील एका शेतात झोपले. मात्र ते सकाळी झोपेतून उठले नाहीत. त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.