औरंगाबाद : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. वंशवादाचे प्रतीक तर मी देखील आहे. पण जर मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकणार नाहीत,’ असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये होणाऱ्या वाईट प्रथांचा उल्लेख करत घराणेशाहीच्या वाईट प्रथांचा उल्लेख करताना जनतेत राहणाऱ्या नेत्यांना बाहेर काढता येणार नाही, असे पंकजा मुंडे यांना सुचवायचे होते. मात्र, भाषणा दरम्यान त्यांच्या विधानाचे अर्थ मोदीही संपवू शकत नाहीत, या अर्थाशी जोडला गेल्याने या भाषणाची पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. सेवा सप्ताहानिमित्त बुद्धीजीवी वर्गासमोर त्यांचे सोमवारी भाषण झाले होते. त्या चित्रफितीमध्ये त्यांनी केलेले घराणेशाहीवरील वक्तव्य नवा वाद घडविणारे असू शकते, असे मानले जात आहे.

आता पुन्हा निवडणुका आल्या आहेत. त्यात पुन्हा सुरू होईल अमुक- तमुक. जात- पात, पैसा. राजकारण आता करमणुकीचे साधन होऊ लागले आहे. गरबा करा, दांडिया करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा, काय चालले आहे हे?  हे जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नव्हते आणि नाही. आपल्या माध्यमातून चांगले काम व्हावे असे वाटते, असे त्या भाषणात म्हणाल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराणेशाही संपवायची आहे. मीही घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करते. पण मला नाही संपवू शकत. अगदी मोदीजीही नाही.

पंकजा मुंडे</p>