प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीची हत्या

दोघांच्या लग्नाला मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता.

औरंगाबाद : गावातीलच तरुणाबरोबर प्रेमविवाह केल्याच्या रागातून आईने तरुणीची हत्या केली.या गुन्ह्य़ात मुलीचा अल्पवयीन भाऊही सहभागी होता. वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात रविवारी ही घटना घडली.  याप्रकरणी मुलीची आई व भावाला ताब्यात घेण्यात आल्याचे वैजापूरचे पोलीस उपअधीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.

१९ वर्षीय तरुणी व तिच्याच वयाचा तरुण हे दोघेही एकाच समाजातील आहेत.  दोघांच्या लग्नाला मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता.

 सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले. रविवारी मुलीला भेटण्यासाठी म्हणून आई व भाऊ दोघेही तिच्या सासरी आले होते. तेथे तरुणीचा खून केला. या वेळी तिचा पतीही होता. मात्र त्याच्यावरही हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्याने तेथून जिवाच्या भीतीने पळ काढला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mother killed daughter over love affair zws

ताज्या बातम्या