scorecardresearch

औरंगाबादेत पती-पत्नीचा गळा चिरून खून, मृतदेह सडून परिसरात दुर्गंध आल्यानंतर घटना उघड

औरंगाबादेतील पुंडलिकनगरमध्ये गल्ली नं. ४ मधील हनुमान मंदिर शेजारीच राहणाऱ्या श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (५५) व किरण श्यामसुंदर (४१) या दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना समोर आलीय.

Aurangabad Murder 3

औरंगाबादेतील पुंडलिकनगरमध्ये गल्ली नं. ४ मधील हनुमान मंदिर शेजारीच राहणाऱ्या श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (५५) व किरण श्यामसुंदर (४१) या दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. फॉरेन्सिक लॅबचेही पथक घटनास्थळावर आले आहे. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली आहे.

हेही वाचा : तीन खुनांच्या घटनांनी औरंगाबाद हादरले; भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या

हत्या तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. परिसरात दुर्गंधी सुटला आहे. श्यामसुंदर कळंत्री यांचा राहात्या घराजवळच रेडिमेड कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा घरातून गायब आहे. मारेकरी घरातीलच असण्याचा संशय बळावला आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder of husband wife in pundaliknagar aurangabad pbs

ताज्या बातम्या