औरंगाबादेत तरूणीचा खून

शहरात एका १९ वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला.

शहरात एका १९ वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला. नारेगाव भागातील राजेंद्रनगरात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रेणुका देविदास ढेपे, असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. मृत तरुणीच्या डोळ्यात प्रथम वार केला व त्यानंतर तिचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder young girl aurangabad police government medical college hospital amy

Next Story
मुंडके छाटून धड विहिरीत फेकले; आरोपी सहा तासात जेरबंद
फोटो गॅलरी