औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

Women protection shakti law maharashtra in marathi

औरंगाबाद : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. देवगिरी महाविद्यालयानजीक शनिवारी दुपारी ही घटना घडली. सुखप्रीत कौर (वय १९) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर शरणसिंग सेठी (वय २०, रा. भीमपुरा) याने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. याप्रकरणी समजलेली माहिती अशी, की सुखप्रीत येथील एका नामांकित महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षांत शिक्षण घेत आहे.

शरणसिंग सेठीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याची कुणकुण सुखप्रीतच्या कुटुंबीयांना लागल्यावर काही दिवसांपूर्वी सुखप्रीतचे वडील व भावाने शरणसिंग सेठीला मारहाण करत समज दिली होती. यातून चिडून जाऊनच शरणसिंग सेठी याने आज दुपारी सुखप्रीतला गाठले आणि जवळील धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

 घटनास्थळी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी लगोलग दाखल झाले. पोलिसांनी मारेकऱ्याच्या शोधासाठी पथके रवाना केली असून लवकरच त्याला अटक केली जाईल असे त्यांच्याकडून सांगितले आहे. मुलीचे वडील चिकलठाण्यातील एका कंपनीत कामाला आहेत, तर शरणसिंग सेठीचे वडील रिक्षा चालवतात. दरम्यान, औरंगाबादेत मागील चार दिवसांत खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत.

  • औरंगाबाद जिल्हा मागील चार दिवसांत पाच खुनांच्या घटनांनी हादरला.
  • शनिवारी भरदुपारी एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीची हत्या करण्यासह एकाच दिवशी तीन खुनांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.
  • या तीन घटना वेदांतनगर, जवाहरनगर व जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. तर एक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन दिवसांपूर्वीची व एक घटना ग्रामीण पोलीस विभागाच्या पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder young woman one sided love aurangabad college teaching assassination weapon ysh

Next Story
तीन खुनांच्या घटनांनी औरंगाबाद हादरले; भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या
फोटो गॅलरी