छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत विशेष गाड्यांना नियमित करून नवीन गाड्यांची सुरूवात करण्यात आली आहे. काही गाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दक्षिणेत तिरुपती देवस्थानाशी जोडणाऱ्या गाड्या आता नियमित सुरू कण्यात आल्या आहेत. नांदेड आणि जालन्यावरुन जाणाऱ्या या रेल्वेमुळे स्थानिकांना माेठा लाभ मिळेल असा दावा केला जात आहे.
नांदेड – तिरुचानूर – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नियमित सुरु केली जाणार आहे. या गाडीची मागणी अधिक होती. पूर्वी चालविण्यात येत असलेल्या विशेष गाडीचे नियमितीकरण करुन आता नांदेड – तिरुचानूर – नांदेड दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. ही गाडी दर शनिवारी न मे पासून सुरू करण्यता आली आहे.
नांदेड तिरुचानूर आणि रविवारी परतीचा प्रवास करणारी ही गाडी मराठवाड्यातील प्रवाशांना उपयोगी ठरणारी आहे. ही गाडी नांदेड, मुदखेड, निजामाबाद, वारंगल, विजयवाडा, नेल्लोर, रेनीगुंटा या स्थानकावर थांबवणार आहे.
जालना – तिरुचानूर – जालना साप्ताहिक एक्सप्रेस नियमीत करण्यात आली आहे. जालना – तिरुचानूर – जालना दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. दर सोमवारी ही गाडी सकाळी सात वाजता तरुचानूर येथे जाणार असून मंगळवारी ती पुन्हा जालन येथे येईल. ही गाडी परभणी, लातूर रोड, विकाराबाद, गुंटूर, रेनीगुंटा आदी स्थानकां मार्गे धावणार आहे.
तसेच पूर्णा – जालना – नांदेड डेमू पॅसेंजर नियमित सुरु करण्यात आली आहे. पूर्वी चालविण्यात येत असलेल्या स्पेशल गाडीचे नियमितीकरण करून ती आता दैनंदिन पूर्णा – जालना – नांदेड करण्यात आली आहे. पूर्णा – जालना दररोज तसेच परभणी, सेलू परतूर मार्गे धावणार असून स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
नांदेड – रायचूर -परभणी प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, विद्यमान नांदेड -रायचूर –परभणी एक्सप्रेसचा जालना पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. रायचूर जालना या गाडीचा विस्तार करण्यात आला असून परभणी, सेलू, परतूर मार्गावरील प्रवाशांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
या बदलामुळे गाडी क्र. 57659 परभणी – नांदेड पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.
