नांदेड : डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या दोन मेडिकलवर वजीराबाद पोलिसांनी धाड टाकत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या जप्त केल्या. ही कारवाई रविवार दि.२४ रोजी केली.

शहरातील काही मेडिकल दुकानावर तरुणांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरल्या जात असलेल्या गोळ्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना मिळाली त्यांनी या बाबीची माहिती पोलीस दलातील अधिकाऱ्यांना दिली.
नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची सुटका व्हावी. यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नशेसाठी वापरले जाणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडील अमली पदार्थांचा साठा जप्त केला जात आहे.

रविवारी वजीराबाद पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांना सोबत घेत शहरातील काही मेडीकल दुकानावर बनावट ग्राहक तयार करून बाफना भागातील ऑक्सिजन मेडिकल व दत्तनगर येथील हेल्थ ओके मेडिकल या दुकानावर पाठवले व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या मागितल्या असता मेडीकल चालकाने डॉक्टरांच्या चिठ्ठिशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या दिल्यानंर दोन मेडीकल दुकानावर धाड टाकत १ हजार ५४० प्रिगलब या नावाच्या नशेच्या गोळ्या जप्त केल्या.

ही कारवाई वजीरबाद पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या पथकाने केली आहे.या प्रकरणी वजीराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु होती.

नशेच्या विळाख्यात अडकलेल्या तरुणाईची सुटका व्हावी. तरुणाईला नशेसाठी प्रोत्साहन देणार्यावर कारवाई व्हावी या उदात्त हेतूने नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार चालवत असलेल्या ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहिमेचे स्वागत केले जात आहे.