आता ४ नगरपंचायत निवडणुकांचे पडघम

शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायती, तसेच बाजार समितीची निवडणूक पार पडल्यानंतर आता चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.

शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायती, तसेच बाजार समितीची निवडणूक पार पडल्यानंतर आता चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने मतदारयादी तयार केली असून १९ सप्टेंबपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय मोच्रेबांधणीला वेग आला असून आजी-माजी आमदारांनी दंड थोपटले आहेत.
आष्टी, पाटोदा, शिरूर व वडवणी या चार नव्या नगरपंचायतींची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या ऑक्टोबरमध्ये निवडणूक जाहीर होऊ शकते. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रभागरचना, आरक्षण आणि प्रारूप मतदारयादी तयार झाली. प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून १ ऑगस्ट २०१५च्या विधानसभा मतदारयादीतून मतदारयादी तयार करण्यात आली. या संदर्भात १९ सप्टेंबपर्यंत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. वडवणी व अंबाजोगाई बाजार समित्यांची निवडणूक झाल्यानंतर आता चार नगरपंचायत निवडणुकांची उत्सुकता लागली आहे.
वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी आमदार आर. टी. देशमुख, राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्यासह शिवसेना नेत्यांनीही तयारी सुरू केली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही नगरपंचायती आष्टी विधानसभा मतदारसंघात आहेत. या ठिकाणी भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. पाणी प्रश्नावरून मध्यंतरी धस यांनी नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरले होते. शहरी भागामधील मतदार असल्यामुळे दोन्ही नेत्यांनी आष्टी शहरासह शिरूर व पाटोद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब िपगळे यांनीही पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बठक घेऊन नगरपंचायतीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Now 4 town council election