मराठवाड्यात भाजपमध्ये खदखद

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचाच असे भाजप नेत्यांनी ठरविले होते.

|| सुहास सरदेशमुख

खतगावकरांचा पक्षत्याग, पंकजा मुंडे यांचे खडे बोल

औरंगाबाद : पक्षापेक्षाही ‘ओबीसी’ महत्त्वाचा असा संदेश देणारे महादेव जानकर यांचे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमधील भाषण, ‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार’ ही भाजप आमदारांमध्ये निर्माण केलेल्या भावनेवर पंकजा मुंडे यांनी ठेवलेले बोट, सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन बाहेर पडलेले भास्करराव खतगावकर पाटील या राजकीय घडामोडीमागे देवेंद्र फडणवीस यांना धक्का आणि त्यांच्या राजकारणाला छेद देणाऱ्या घटना दृश्य स्वरूपात पुढे येऊ लागल्या आहेत. मराठवाड्यातून भाजपला मिळालेला धक्का आणि भाजपमधील अंतर्गत राजकारणातील खदखद पुन्हा नव्याने राजकीय पटलावर दिसून लागली आहे.

 देगलूर मतदारसंघात उमेदवारी दिल्यानंतर भास्करराव खतगावकर लगेच पक्ष बदलतील असे भाजप नेत्यांना वाटत नव्हते. त्यांची देवेंद्र फडणवीस यांनीही खास भेट घेतली होती. पण ते पक्ष सोडून जातील या भाजप नेत्यांच्या समजुतीला आता धक्का बसला आहे.

खरे तर लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचाच असे भाजप नेत्यांनी ठरविले होते. त्यामुळेच अशोकराव चव्हाण यांना राजकीय धक्का देण्यासाठी खतगावकरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्याचा फायदाही भाजपला झाला. पण लोकसभा निवडणुकीनंतर प्रताप पाटील चिखलीकर जसे म्हणतील तसे भाजपचे नेते वागत गेले.

सुभाष साबणे यांना उमेदवारी देताना केलेली घाई, चिखलीकर यांच्या सांगण्यावरून होणाऱ्या नियुक्त्या, त्यातून निर्माण होणारे मानापमान यामुळे खतगावकर वैतागले होते, असे सांगण्यात येते. त्यातून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. चिखलीकरांना फडणीस यांनी अधिकच जवळच केल्याचे संदेश वारंवार मिळत राहिल्याने भास्करराव खतगावकरांचे जाणे फडणवीस यांनाही धक्का मानला जात आहे. खतगावर पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले आणि अशोकराव चव्हाण यांनीही त्यांचे स्वागत केले आहे. ही घटना भाजपला पर्यायाने विरोधी पक्ष नेते फडवीस यांच्या राजकारणालाही धक्का मानला जात आहे.

 भाजपत निर्णय समूह शक्ती कमालीची व्यक्तिकेंद्रित झाल्याने मराठवाड्यातील ‘ओबीसी’ वर्ग कमालीचा नाराज आहे. त्या नाराजांचे नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात पक्ष नेतृत्वाला त्यांनी कानपिचक्या दिल्या. आता महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी भाजप आमदारांमध्ये निर्माण करून ठेवलेल्या भावनेतून त्यांना बाहेर काढून विरोधक म्हणून भूमिका बजावण्याची गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तत्पूर्वी या मेळाव्यातील भाषणात ‘ओबीसी’चा स्वर कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे, असे चित्रही रेखाटण्याचाही प्रयत्न झाला. तो आवाज महादेव जानकर यांनी उंचावला.

ओबीसी घटकातील धनगर व्यक्तीला नेहमी पशुसंवर्धन खाते कशासाठी इथपासून ते ओबीसीच्या राजकीय आरक्षणापर्यंतचे विषय हाताळताना जी काही टोलेबाजी झाली तो फडणवीस करीत असणाऱ्या राजकारणाला छेद मानला जात आहे. अंतर्गत धुसफुस जाहीरपणे व्यक्त होताना कधी स्वर उंच करावा लागतो तर कधी दुसऱ्या कार्यकर्त्यांनी आवाज उंचावावा अशी रचना केलेली असती. जानकरांनी सूर उंचावून जाब विचारणे हात पक्षापेक्षा ओबीसी महत्त्वाचा हे सांगणार होता. तेव्हा पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हे सारे फडणवीस यांच्या राजकारणाला छेद असल्याचेही मानले जाते. अन्य पक्षातून भाजपातून आलेले नेते आता पुन्हा स्वगृही परतत असल्याने भाजपमधील नेतृत्वासमोर नवे आव्हान निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

भाजपत निर्णय समूह शक्ती कमालीची व्यक्तिकेंद्रित झाल्याने मराठवाड्यातील ‘ओबीसी’ वर्ग कमालीचा नाराज आहे. त्या नाराजांचे नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात पक्ष नेतृत्वाला त्यांनी कानपिचक्या दिल्या. आता महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी भाजप आमदारांमध्ये निर्माण करून ठेवलेल्या भावनेतून त्यांना बाहेर काढून विरोधक म्हणून भूमिका बजावण्याची गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Obc bjp mahadev jankar pankaja munde government of mahavikas aghadi devendra fadnavis akp

Next Story
बेगमपुऱ्यातील दस्तनोंदणी; महसूल यंत्रणाही सरसावली!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी