लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांपूर्वी ‘महायुती’वर भरभरून प्रेम करणाऱ्या मराठवाड्याने यावेळी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरश: खड्यासारखे बाजूला केले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे या बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभूत झाल्या. लातूर, नांदेड आणि जालना हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले. ठाकरे गटाला मराठवाड्यात सहानुभूती होतीच. छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळता हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने दणदणीत विजय मिळवला. महायुतीच्या पारड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या संभाजीनगरची जागा आली. येथून संदिपान भुमरे विजयी झाले. पूर्वी सात महायुतीच्या बाजूने तर एक एमआयएम असे मराठवाड्यातील राजकीय बलाबल होते. आता काँग्रेस तीन, उद्धव ठाकरे तीन, असे झाले असून बीडची जागा कोणाच्या वाट्याची हे चित्र हे वृत्त लिहीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.मराठवाड्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासमोर आपला उमेदवार असूच नये, अशी रचना भाजपकडून करण्यात आली होती.

Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Kidnap, boy, Nandivali,
कल्याणमध्ये नांदिवलीतून अल्पवयीन गुराख्याचे अपहरण
thieves beat up the employees and stole the catering materials
मुंबई : कर्मचाऱ्यांना मारहाण करून चोरट्यांनी पळवले केटरिंग साहित्य
grief of the families of Naxalites Extortion for education and family of Naxalites is suffering
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची व्यथा! एकीकडे शिक्षणासाठी खंडणी तर दुसरीकडे…
AAP Finds Errors in Rs 100 Crore Road Works in Kolhapur, aam aamdmi party, AAP Pressures Municipal Officials for Accountability Road works, Kolhapur Municipal Officials, Errors in Rs 100 Crore Road Works,
कोल्हापुरातील १०० कोटीच्या रस्त्यांचा ‘आप’ने केला पंचनामा; अधिकारी धारेवर; गटार चॅनेल गायब
Nana Patole criticize rulers party in akola use of offensive words
अकोला : गरिबांच्या साड्यांमध्ये देखील दलाली, नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; अपशब्दांचा वापर
Network, drug smugglers,
ड्रग्स तस्करांचे विदर्भात जाळे, नागपुरात ३१ लाखांची एमडी पावडर जप्त
Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलमध्ये अनिवासी भारतीय दाम्पत्याला मारहाण; काँग्रेस नेत्याने कंगणा रणौत यांच्यावर झालेल्या हल्लाशी जोडला संबंध; म्हणाले…

मराठवाड्यातून निवडून आलेले खासदार

● धाराशिव – ओम राजेनिंबाळकर यांचा तीन लाखांहून अधिक फरकाने विजय

● हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर यांचा एक लाखाच्या फरकाने विजय

● परभणी – संजय जाधव यांचा तिसऱ्यांदा विजय

काँग्रेसने मराठवाड्यातील आठ जागांपैकी तीन जागांवर विजय मिळवला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील काँग्रेसला वाली कोण, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात होता. मात्र, केवळ अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये काँग्रेसने यश मिळवले. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सहावा विजय कल्याण काळे यांनी रोखून धरला. ८५ हजारांहून अधिक मतांनी ते निवडून आले.

हेही वाचा >>>Aurangabad Lok Sabha Result 2024: “निकाल पाहतोय तर दिसतंय माझं एकतर्फी प्रेम सुरू होतं”, निकालानं इम्तियाज जलील यांना धक्का

● लातूर- डॉ. शिवाजी काळगे

● नांदेड- वसंत चव्हाण

● जालना- कल्याण काळे

२०१९ मधील स्थिती

● एकूण जागा – ८

● महायुती – सात भाजप – ४

● शिवसेना – ३

● एमआयएम – एक

लातूर, जालना, बीड, नांदेड या चार जागांवर भाजपचे वर्चस्व होते. धाराशिव, परभणी आणि हिंगोली येथे शिवसेनेचे खासदार होते ते भाजपबरोबर युतीमध्ये होते.

आठ मतदारसंघापैकी फक्त एक औरंगाबादच्या जागेवर एमआयएमचा विजय झाला होता. मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला आहे.

२०२४ मधील स्थिती

● शिवसेना शिंदे गट : १

● शिवसेना उद्धव ठाकरे : ३

● काँग्रेस : ३

● राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : १

भाजपच्या व्यवस्थापनाचेही गुण अधिक

मंत्री अतुल सावे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी निवडणुकीपूर्वी मतदार केंद्रनिहाय नियोजन केले होते. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. भाजप-शिवसेना युतीच्या आमदारांनी ताकद उभी करताना नीट ‘व्यवस्थापन’ केल्यामुळे संदिपान भुमरे यांना यश मिळाल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.