Parbhani ZP Election Results LIVE Updates (परभणी जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. परभणी जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.
परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Parbhani ZP Election Schedule 2026)
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत परभणी जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.
त्यानुसार, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
| निवडणूक टप्पा | तारीख / वेळ |
|---|---|
| सूचना प्रसिद्धी | १६ जानेवारी |
| नामनिर्देशन स्वीकारणे | १६ जानेवारी ते २१ जानेवारी |
| छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| माघारीची अंतिम मुदत | २७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत |
| अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप | २७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर |
| मतदान | ७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत |
| मतमोजणी | ९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून |
परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Parbhani Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)
परभणी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ५४ निवडणूक विभाग आणि ९ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १०८ पंचायत समिती वॉर्ड आहेत.
| माहिती | संख्या |
|---|---|
| जिल्हा परिषद एकूण वॉर्ड | ५४ |
| पंचायत समिती (सीट संख्या) | ९ |
| पंचायत समिती एकूण वॉर्ड | १०८ |
Parbhani Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats परभणी जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा
२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष २४ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १३ जागांसह शिवसेना पक्षाची कामगिरी राहिली.
परभणी जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर उज्वला विश्वनाथ राठोड यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)चे भावना अनिल नखाते यांनी बाजी मारली होती.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| राष्ट्रवादी | २४ |
| शिवसेना | १३ |
| काँग्रेस | ६ |
| इतर | ६ |
| भाजपा | ५ |
| एकूण | ५४ |
परभणी जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Parbhani Zilla Parishad Ward Wise Results 2017)
परभणी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ५४ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.
| वॉर्ड क्रमांक | विजेत्याचे नाव | विजेत्या पक्षाचे नाव |
|---|---|---|
| ५१ | किशनराव धर्माजी भोसले | राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) |
| १६ | अंजली गंगाप्रसाद अनेराव | शिवसेना (SHS) |
| ५३ | भगवान ज्ञानोबा सानप | स्वतंत्र |
| १ | ममता मुरलीधर मते | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २ | उज्वला विश्वनाथ राठोड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३ | इंदुबाई आसाराम घुगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४ | अरुणा अविनाश काळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५ | नमिता संतोषराव बुधवंत | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६ | संगीता विठ्ठल घोगरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७ | मीना नानासाहेब राऊत | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ८ | अजय अशोकराव चौधरी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ९ | शालिनीबाई शिवाजीराव राऊत | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १० | बाबिनंद प्रभाकर रोहिणकर | शिवसेना (SHS) |
| ११ | अर्चना गजानन गायकवाड | शिवसेना (SHS) |
| १२ | शोभा हनुमंतराव बोबडे | शिवसेना (SHS) |
| १३ | वंदना गोविंदराव देशमुख | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| १४ | सुषमा गोविंदराव देशमुख | स्वतंत्र |
| १५ | बाळासाहेब तुकाराम रेंगे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| १७ | जनार्दन एकनाथ सोनवणे | शिवसेना (SHS) |
| १८ | अंजली रवींद्र देशमुख | शिवसेना (SHS) |
| १९ | समशेर सुरेशराव वरपुडकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २० | शोभा रामभाऊ घाटगे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २१ | विष्णू नामदेवराव मांडे | शिवसेना (SHS) |
| २२ | वैशाली पंकज जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २३ | गंगुबाई रामलू नागेश्वर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २४ | स्नेहा प्रदीप रोहिणकर | शिवसेना (SHS) |
| २५ | रामराव अर्जुन उबाळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २६ | राजेंद्र राधाकिशन लहाने | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २७ | अशोक अण्णासाहेब काकडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २८ | इंद्रायणी बाळासाहेब रोडगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २९ | राम सुखदेव पाटील | शिवसेना (SHS) |
| ३० | भावना अनिल नखाते | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३१ | मीरा दादासाहेब टेंगसे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३२ | उमा रंगनाथराव वाकणकर | शिवसेना (SHS) |
| ३३ | कुंडलिक नामदेव सोगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३४ | वसुंधराबाई सुभाषराव घुंबरे | शिवसेना (SHS) |
| ३५ | निर्मला उत्तमराव गवळी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३६ | राधाबाई विठ्ठल सूर्यवंशी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३७ | दगडूबाई आश्रोबा तीथे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३८ | प्रभाकर दत्तराव चापके | शिवसेना (SHS) |
| ३९ | विशाखा विश्वनाह सोळंके | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४० | अरुणा कोंडिबा सोनटक्के | स्वतंत्र |
| ४१ | उर्मिला मारोतराव बनसोडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४२ | इंदुबाई गणेशराव अंबोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४३ | श्रीनिवास बळीरामजी जोगदंड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ४४ | पार्वती शंकर वाघमारे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४५ | भरत मोहनराव घनदाट | स्वतंत्र |
| ४६ | मंगलाबाई गणेशराव रोकडे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४७ | पर्णिता रूपला राठोड | राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) |
| ४८ | सुभाष गंगाधर कदम | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४९ | राजेश काशिनाथराव फड | राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) |
| ५० | संध्या प्रल्हाद मुरकुटे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५२ | करुणाबाई बाळासाहेब कुंडगीर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५४ | श्रीनिवास ज्ञानदेव मुंढे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
परभणी जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Parbhani ZP Ward Wise Election Results 2026)
परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ५४ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये एकूण १०८ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १,८३६,०८६ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.
महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे
| क्रमांक | पंचायत समित्यांची नावे |
|---|---|
| १ | सेलू पंचायत समिती |
| २ | जिंतूर पंचायत समिती |
| ३ | परभणी पंचायत समिती |
| ४ | माणवत पंचायत समिती |
| ५ | पाथरी पंचायत समिती |
| ६ | सोनपेठ पंचायत समिती |
| ७ | गंगाखेड पंचायत समिती |
| ८ | पालम पंचायत समिती |
| ९ | पूर्णा पंचायत समिती |
महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे
प्र. परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?
उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.
प्र. परभणी जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?
उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.
प्र. परभणी जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?
उ. परभणी जिल्हा परिषदेत एकूण ५४ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात ९ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण १०८ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.
प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?
उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.
प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?
उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.
प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?
उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.
प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?
उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?
उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.
प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?
उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.
प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?
उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?
उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.
प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?
उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.
प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?
उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.
प्र. मतदारांना परभणी जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?
उ. मतदारांना परभणी जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.
डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.
