मनपाच्या अतिक्रमण पथकावर हल्ला

धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधातही सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली.

औरंगाबाद :  शहरातील दिल्ली गेट, सलीम अली सरोवर परसिरातील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या पथकाकडून मंगळवारी हटवण्यात आली. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी मनपाच्या पथकातील जेसीबीवर हल्ला करून काच फोडली. काही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी मनपाकडून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती अतिक्रमण प्रतिबंधक पथक विभागाकडून देण्यात आली.

मो.जलालोद्दीन मा. नसिरोद्दीन यांच्या अतिक्रमित जागेवर कारवाई करत असताना त्यास विरोध झाला. निसार खान सत्तार खान, अन्सार खान यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध करून पथकातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी रॉडने इमारत निरीक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला चुकवण्यात आला. पथकातील पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतले. निसार खान सत्तार खान, अन्सार खान व इतर एकाविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इतर ठिकाणच्या कारवाईदरम्यान अ‍ॅड. आमेर खान अन्वर खान, सेख नवीद यांनीही विरोध केला. पथकाला शिवीगाळ केली. जेसीबीसमोर येऊन आडवे पडले. पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांनी धक्काबुक्कीही करून जिवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधातही सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. रिजवाना बशीर पटेल यांनीही लोखंडी जाळी लावून अतिक्रमण केले होते. त्यांचेही अतिक्रमण काढण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: People attack on municipality encroachment team in aurangabad zws