‘एमआयएम’च्या नामांतरविरोधी आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’ने शनिवारी केलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली.

au name aurangabad
‘एमआयएम’च्या नामांतरविरोधी आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’ने शनिवारी केलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली. खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र नामांतरविरोधातील लढय़ाला बदनाम करण्याच्या उद्देशानेच काही तरुणांनी औरंगजेबाचे छायाचित्र आंदोलनस्थळी आणल्याचे स्पष्टीकरण दिले.

नामांतर संघर्ष समितीच्या वतीने शनिवारपासून साखळी आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात मोठय़ा संख्येने तरुण सहभागी झाले होते. ‘आय लव्ह  आौरंगाबाद’ असे फलक या आंदोलक तरुणांच्या हातात झळकत होते. मात्र, दुपारी अचानक काही तरुण आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवले.  दरम्यान या घटनेची कुणकुण खासदार जलील यांना लागल्यानंतर आणि त्यावरून वाद उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्यासाठी भूमिका मांडली. औरंगाबादच्या नामांतराला उद्योग, सर्वसामान्य जनतेतून विरोध होत असून आपल्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या उद्देशानेच काही तरुणांनी येथे औरंगजेबाचे छायाचित्र येथे प्रदर्शित केले. या घटनेशी एमआयएमचा कसलाही संबंध नसल्याचा खुलासा जलील यांनी केला. 

वंचितचाही पाठिंबा

आंदोलनादरम्यान, माजी नगरसेवक ढगे व इतर पदाधिकारी नामांतरविरोधातील अर्ज भरून घेत होते. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे सचिव तैय्यब जफर यांनी नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ, असे नाव कायम असेल तोपर्यंत आम्हीही शहराला औरंगाबाद म्हणू, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार जलील यांच्या नेतृत्वाखालील नामांतर विरोधातील आंदोलनाला पाठिंबा असल्याचे तैय्यब जफर यांनी जाहीर केले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 00:02 IST
Next Story
“छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध?”, नामांतरावरून इम्तियाज जलील यांचा सवाल; म्हणाले…
Exit mobile version