औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलिस दलातील बदल्या कधी होणार याची चर्चा पोलिस आयुक्तालयात सुरू होती. अखेर बदल्यांचा मुहूर्त मंगळवारी सापडला असून शहर पोलिस दलातील तब्बल १ हजार कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी मंगळवारी काढले. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयात परजिल्ह्यातून बदलीवर आलेल्या ३० कर्मचाऱ्यांनाही नियुक्ती मिळाली  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही हलवण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयातील जवळपास ८३७ सहाय्यक फौजदार, पोलिस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १३ जणांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. तर २१

कर्मचाऱ्यांना दंगा नियंत्रण पथक व क्युआरटी पथकात एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच ५५ कर्मचाऱ्यांच्या दंगा नियंत्रण पथकातून इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये ९९ वाहन चालकांच्याही इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.  दरम्यान, बृहन्मुंबई, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, उस्मानाबाद, जालना आदी जिल्ह्यातून शहर पोलिस आयुक्तालयात बदलीवर आलेल्या ३० कर्मचाNयांपैकी १७ जणांना दंगा नियंत्रण पथकात तर १३ जणांना पोलिस नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे. बदल्या झालेल्या कर्मचाNयांना नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेशही पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी दिले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी कळविली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police chief orders over transfer of 1000 personnel in aurangabad zws
First published on: 24-05-2022 at 20:59 IST