विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच भाजपाकडून मोठी खेळी सूरू असून राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी केला आहे. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही भाष्य केलं.

हेही वाचा – “मी माघार…” नॉट रिचेबल शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात आल्यावर काय म्हणाल्या?

What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वेगळी खेळी सूरू आहे. भाजपा राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याच्या प्रयत्नात आहे. मी जे बोलतो आहे, ते देवेंद्र फडणवीसांना आवडणार नाही, पण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच नगरमध्येही मोठं राजकारण सुरू असून बाळासाहेब थोरतही मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही केलं भाष्य

पुढे बोलताना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही भाष्य केलं आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत. त्यासाठी जागा वाटपही निश्चित झाले आहे. तसेच आमची युती २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असतील का? याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकूण २०-२२ लोकांनी अर्ज केले, त्यातील…”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

काँग्रेसवर जोरदार टीकास्र

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीकास्र सोडले. ‘काँग्रेसवर भरोसा ठेवू नये हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटारडे व्यक्ती आहेत. त्यांनी मला मंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण केले होते, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.