छत्रपती संभाजीनगर : मागास जिल्हा म्हणून विकासासाठी आवश्यक असणारा निधी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे दाखल केलेल्या आक्षेपांमुळे स्थगित करण्यात आलेला आहे. अर्थमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तीन – चार बैठकांनंतरही निधीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. निधीच्या अनुषंगाने संपर्क साधूनही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निधी वितरणाची स्थगिती उठवावी, अशी विनंती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या पत्रामुळे महायुतीतील मतभेत समोर आले आहेत.

गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२४ – २५ मधील उर्वरित निधीचे वितरण करण्यासाठी पूर्वीचे पालकमंत्र्यांनी लावलेले सूत्र वापरले होते. या निधी वितरणास सर्व सदस्यांची मंजुरी होती. त्यामुळे जुन्याच सूत्रानुसार निधी वितरणास मंजुरी दिली होती. या बैठकीत तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कोणतेही आक्षेप घेतले नव्हते. मात्र, नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्र्यांकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर या निधीस स्थगिती देण्यात आली. या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी घेण्यात आलेल्या तीन – चार बैठकीतून ताेडगा निघू शकला नाही. परिणामी आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, जलसंधारण व महावितरण विभागाची अत्यावश्यक कामे निधी अभावी रखडली आहेत. निधी वितरणाची स्थगिती उठवावी, अशी विनंती करणारे पत्र उपमुख्यमंत्र्यांनाही सादर करण्यात आले आहे. ‘विकासकामांना स्थगिती देणारे सरकार नसून, विकासकामांना प्राधान्य देणारे सरकार आहे,’ असा संदेश देण्यासाठी निधी स्थगितीबाबतचा विचार करून निधी वितरणाबाबतची प्रक्रिया कशी राबवावी, याचे मार्गदर्शन करावे, अशी विनंती पालकमंत्री या नात्याने करत आहे, अशा शब्दांत पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिले आहे. २०२४- २५ मध्ये पालकमंत्री म्हणून तानाजी सावंत हे काम पाहत होते. तेव्हा वितरित केलेल्या निधीस स्थगिती देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४ – २५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील २६८ कोटी रुपयांच्या खर्चास स्थगिती देण्यात आली होती.कीर्तीकुमार पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव जिल्हा नियोजन आराखड्यातील कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर निधीला स्थगिती देण्यात आली होती. निधी स्थगिती कधी उठवायची याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. विसंवाद ठेवल्याचा ठपका वास्तवाला धरुन नाही.राणा जगजीतसिंह पाटील, आमदार धाराशिव