औरंगाबाद : प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएच.डी.ला स्थगिती ; विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय | Prof Dr Phulchand Salampure Ph D was decided by the examination board meeting of the university amy 95 | Loksatta

औरंगाबाद : प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएच.डी.ला स्थगिती ; विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डाॅ. फुलचंद भगीरथ सलामपुरे यांच्या पीएच.डी. ला स्थगिती देण्यात आली आहे.

औरंगाबाद : प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएच.डी.ला स्थगिती ; विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डाॅ. फुलचंद भगीरथ सलामपुरे यांच्या पीएच.डी. ला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी कुलपतींकडे प्रकरण पाठवण्यात येईल, असे विद्यापीठातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता डाॅ. सलामपुरे यांनी पीएच.डी. च्या आधारेच अधिसभा व व्यवस्थापन परिषदेवर वर्णी लावून घेतलेल्या लाभाचा मुद्दा आता पेटणार आहे.

आकाश गुलाबराव हिवराळे यांनी कुलपती व कुलगुरूंकडे डाॅ. सलामपुरे यांच्या प्रबंधांबाबत तक्रार केली होती. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे नेते आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेले डाॅ. फुलचंद सलामपुरे यांनी २०१३ सालच्या समाजशास्त्र विषयात संशोधनासाठी डाॅ. शिवाजी दौलतराव भागानगरे (अर्थशास्त्र – २०११) यांच्या संशोधन कार्याची नक्कल केली आहे. त्यामुळे डाॅ. सलामपुरे यांची पीएच.डी. रद्द करून संशोधक व मार्गदर्शक प्राचार्य डाॅ. दादासाहेब मोटे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे तक्रारीत म्हटले होते. डाॅ. सलामपुरे यांनी समाजशास्त्र विषयात पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेला शोधप्रबंध हा २०११ या वर्षी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. साठीच्या शोधप्रबंधांची शंभर टक्के नक्कल केली आहे. डाॅ. शिवाजी भागानगरे यांनी प्रा. डाॅ. एन. पी. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला तो शोधप्रबंध आहे. डॉ. सलामपुरे यांनी चोरून त्याची नक्कल केली आहे. हा प्रकार काॅपी राइट ॲक्ट १९९५ चे उल्लंघन असून फसवणुकीच्या गुन्ह्याच्या कलमात मोडणारे आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून प्रा. डाॅ. सलामपुरे यांना लेखी खुलासा करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली होती. तसेच दोन समित्याही गठित करण्यात आल्या होत्या. अखेर डाॅ. सलामपुरे यांची पीएच.डी रद्द करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला कुलगुरू डाॅ. येवले यांनी दुजोरा दिला आहे, तर हे प्रकरण विद्यापीठ कायद्यातील १२८-३ अनुसार पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
योजनांचे लाभार्थी मतदार व्हावेत यासाठी रणनीती; भूपेंद्र यादव यांची भाजप नेत्यांशी चर्चा

संबंधित बातम्या

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्त आणि समर्थाशिवाय शिवाजी महाराज कोण? राज्यपालांचे विधान
नामांतर विरोधी मोर्चातील टीकेचा जोर काँग्रेसवर ; औरंगाबाद नामांतराच्या विरोधात मोर्चा
राज्यातील रिक्त वैद्यकीय पदे भरतीची प्रक्रिया राबवावी; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

व्हिडिओ

ताज्या बातम्या
कास पठाराला घातलेले कुंपण काढण्यास सुरुवात
केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज
विश्लेषण : रॉय दाम्पत्याचे काय चुकले? 
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे