राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते आणि सरकारमधील शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रोज एकमेकांवर टीका, आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलंच तापलंय. किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे संतापलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर सोमय्यांना शिवीगाळही केली. दुसरीकडे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरण उचलून धरलंय. एकंदरीतच राज्यातील राजकारणात चांगलीच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भाष्य केलंय.

“मत खाण्याच्या राजकारणाने दलित समाजाचं भलं होणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी…”; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे

“शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये कुत्रा आणि मांजरीप्रमाणे भांडण सुरू आहे. पण कोण कुत्रा आणि कोण मांजर आहे, हे पाहणं महत्वाचं आहे, असं आठवले म्हणाले. तसेच नेत्यांमध्ये सुरू असलेलं हे भांडण थांबवावं, अशी आमची इच्छा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना थोडी समज द्यावी. संजय राऊतांनी अपशब्द आणि शिवराळ भाषा न वापरता आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे,” असं आठवले म्हणाले. ते औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांचा उल्लेख करत आठवलेंचा टोला

“महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपाने एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. आधी नेत्यांची ही भांडणं मिटली की नंतर शिवसेना आणि भाजपामधील भांडणं मिटवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असं आठवले म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत राहिली तर त्यांचं मोठं नुकसान होईल. आम्हाला सत्तेची कोणतीही गरज नाही. परंतु शिवसेना जर अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तयार झाली तर भाजपा देखील त्यासाठी तयार होईल, पण सध्या असं कोणतंही चित्र दिसत नाही,” असं आठवलेंनी सांगितलं.