औरंगाबाद विमानतळावर योग गुरु रामदेव बाबांनी औद्योगिक सुरक्षा बल च्या जवानांशी संवाद साधत योगासनाचे धडे दिले. सीआयएसएफच्या जमलेल्या अधिकारी वर्ग आणि जवानांना जीवनात योगासनाचे महत्त्व सांगितले. विविध योगासनांची प्रात्यक्षिकेही करून दाखवली. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठीही योग अत्यावश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. उपसमाधीष्ठा पवन कुमार आणि सहाय्यक समाधीष्ठा लक्ष्मीकांत शिंदे यांच्या विनंतीवरून रामदेव बाबांनी योगाचे धडे दिले. यावेळी योगगुरू रामदेव बाबांचा सत्कार करण्यात आला.
