ramdev baba gave yoga lessons to personnel of the industrial security force at aurangabad airport zws 70 | Loksatta

योग गुरु रामदेव बाबांचे विमानतळावर योगासनाचे धडे

औरंगाबाद विमानतळावर योग गुरु रामदेव बाबांनी औद्योगिक सुरक्षा बल च्या जवानांशी संवाद साधत योगासनाचे धडे दिले

योग गुरु रामदेव बाबांचे विमानतळावर योगासनाचे धडे
उपसमाधीष्ठा पवन कुमार आणि सहाय्यक समाधीष्ठा लक्ष्मीकांत शिंदे यांच्या विनंतीवरून रामदेव बाबांनी योगाचे धडे दिले.

औरंगाबाद विमानतळावर योग गुरु रामदेव बाबांनी औद्योगिक सुरक्षा बल च्या जवानांशी संवाद साधत योगासनाचे धडे दिले. सीआयएसएफच्या जमलेल्या अधिकारी वर्ग आणि जवानांना जीवनात योगासनाचे महत्त्व सांगितले. विविध योगासनांची प्रात्यक्षिकेही करून दाखवली. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठीही योग अत्यावश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. उपसमाधीष्ठा पवन कुमार आणि सहाय्यक समाधीष्ठा लक्ष्मीकांत शिंदे यांच्या विनंतीवरून रामदेव बाबांनी योगाचे धडे दिले. यावेळी योगगुरू रामदेव बाबांचा सत्कार करण्यात आला.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 19:45 IST
Next Story
ना आढावा ना चर्चा, मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा केवळ सत्संगासाठी?